शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पदवीधरच्या निवडणुकीसाठी इच्छुक सरसावले

By admin | Published: September 30, 2015 11:56 PM

नोंदणीवर भर : भाजपाकडून अनेक संस्थाचालक इच्छुक

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित होताच इच्छुकांना घुमारे फुटले आहेत. मतदार नोंदणीतच खऱ्या अर्थाने विजय असल्याने पक्षीय इच्छुकांबरोबरच शिक्षण संस्था ताब्यात असलेले अनेक इच्छुक पुढे आले आहेत. पुढील वर्षी निवडणूक होणार आहे.नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघ अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात होता. आधी ना. स. फरांदे आणि त्यांच्यानंतर प्रतापदादा सोनवणे यांनी या मतदारसंघावर पकड कायम ठेवली. परंतु सोनवणे यांना लोकसभेच्या धुळे मतदारसंघातून विजय मिळाल्यानंतर मात्र पदवीधर मतदार संघावरील पकड ढिली झाली. सोनवणे यांनी राजीनाना दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने आगंतुक प्रसाद हिरे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी कॉँग्रेसच्या सुधीर तांबे यांनी त्यांचा पराभव केला. तांबे यांना अवघ्या नऊ महिन्यांसाठी ही संधी मिळाली. त्यामुळे पुन्हा झालेल्या निवडणुकीत हाच एक कळीचा मुद्दा ठरला. त्यानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी एकत्र झाली. त्यामुळे पक्षात अगोदरपासून सक्रिय आणि प्रबळ दावेदार असलेल्या प्रा. सुहास फरांदे यांना यश मिळू शकले नाही. आता पुन्हा निवडणूक होत असताना फरांदे हे इच्छुक नाहीत. तर तांबे यांच्या रूपाने शिक्षण संस्था ताब्यात असणाऱ्यांना पदवीधर नोंदणी विभागात करता येत असल्याचे स्पष्ट झाल्याने आता अनेक संस्थाचालकच रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली किंवा नाही तरी विद्यमान आमदार म्हणून तांबे यांची दावेदारी प्रबळ आहे. तर विरोधक म्हणून भाजपाकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. सध्या भाजपाकडून नाशिकमध्ये मराठा विद्या प्रसारक समाजाचे सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे इच्छुक आहेत. त्यांच्यापाठोपाठ नामकोचे माजी संचालक हेमंत धात्रक तसेच प्रशांत पाटील इच्छुक असल्याचे वृत्त आहे. याशिवाय अहमदनगरमधून अभय आगरकर तर धुळे जिल्ह्यातून संभाजी पगारे हे इच्छुक आहेत. खरी निवडणूक ही नाशिक आणि नगरच्या प्रभावावर आहे. त्यामुळे आता पक्षीयस्तरावर इच्छुकांची व्यूहरचना सुरू झाली आहे. अर्थात त्यासाठी पदवीधरांची सभासद नोंदणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)