शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पाणी योजनेचा कार्यारंभ आदेश असूनही मुहूर्त लागेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 10:23 PM

सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ बुद्रूक येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करण्याच्या योजनेमधून सार्वजनिक पाणीपुरवठ्याची नवीन विहीर व खोदकामाला जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. तरीही सरपंच, उपसरपंच व सदस्य हे काम बंद ठेवून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव यांनी केला असून याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करून पद व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी पंचायतराज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देमऱ्हळ बुद्रूक; पंचायत राज समितीकडे ग्रामस्थांनी केली तक्रार

सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ बुद्रूक येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करण्याच्या योजनेमधून सार्वजनिक पाणीपुरवठ्याची नवीन विहीर व खोदकामाला जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. तरीही सरपंच, उपसरपंच व सदस्य हे काम बंद ठेवून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव यांनी केला असून याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करून पद व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी पंचायतराज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.मऱ्हळ बुद्रूक येथील सरपंच दीपाली म्हस्के, उपसरपंच देवराम कुऱ्हे, सदस्य शिवाजी भालेराव, सुनीता म्हस्के यांना वेळोवेळी भेटून बैठकीत सांगूनही सत्ताधारी पदाधिकारी, सदस्य पाणीपुरवठा योजनेचे काम करीत नाही. अतिक्रमण काढत नाही. उलट अतिक्रमण करणाऱ्यांची पाठराखण करतात, अशी तक्रार भालेराव यांनी केली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य पंकज आढाव, राधिका आढाव आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतGovernmentसरकार