सिन्नर : तालुक्यातील मऱ्हळ बुद्रूक येथे अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांचा विकास करण्याच्या योजनेमधून सार्वजनिक पाणीपुरवठ्याची नवीन विहीर व खोदकामाला जिल्हा परिषदेने प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. तरीही सरपंच, उपसरपंच व सदस्य हे काम बंद ठेवून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते गंगाधर भालेराव यांनी केेला असून याप्रकरणी तत्काळ कार्यवाही करून पद व सदस्यत्व रद्द करण्याची मागणी पंचायतराज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मऱ्हळ बुद्रूक येथील सरपंच दीपाली म्हस्के, उपसरपंच देवराम कुऱ्हे, सदस्य शिवाजी भालेराव, सुनीता म्हस्के यांना वेळोवेळी भेटून बैठकीत सांगूनही सत्ताधारी पदाधिकारी, सदस्य पाणीपुरवठा योजनेचे काम करीत नाही. अतिक्रमण काढत नाही. उलट अतिक्रमण करणाऱ्यांची पाठराखण करतात, अशी तक्रार भालेराव यांनी केली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य पंकज आढाव, राधिका आढाव आदींची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.
(२८ सिन्नर)
सिन्नर येथे आलेल्या पंचायतराज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांना निवेदन देताना गंगाधर भालेराव. समवेत मऱ्हळ बुद्रूक येथील ग्रामस्थ.
280821\28nsk_16_28082021_13.jpg
सिन्नर येथे आलेल्या पंचायतराज समितीचे प्रमुख संजय रायमुलकर यांना निवेदन देताना गंगाधर भालेराव. समवेत मऱ्हळ बुद्रुक येथील ग्रामस्थ.