एसटी प्रवाशांच्या गैरसोयीसाठी?नाशिक : खासगी रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडेवाढ केल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पुन्हा प्रवाशांची गर्दी झाली आहे. गेल्या महिनाभरात शहरात सुरू असलेल्या बसेसचे भारमान तब्बल १० टक्क्यांनी वाढलेले आहे. याचाच अर्थ महामंडळाने सुविधा दिली, तर प्रवाशांचा प्रतिसाद नक्कीच मिळू शकतो. परंतु पराभूत मानसिकता स्वीकारलेल्या महामंडळाने सपशेल माघार घेत आपल्या कर्तव्याशीदेखील प्रतारणा चालविली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील प्रवाशांना वेठीस धरून महामंडळाने आपल्या उत्पन्नात कोणती मोठी वाढ केली याचे उत्तरदेखील त्यांच्याकडे नाही.स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात इलेक्ट्रॉनिक्स बससेवा अािण मेट्रा बससारख्या प्रकल्पाची चर्चा होत असताना पराभूत मानसिकता स्वीकारलेल्या एसटी महामंडळाने आपली सेवा स्मार्ट करण्याचे सोडून प्रवासी वाहतुकीच्या व्यवसायातूनच माघार घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. केवळ महापालिकेकडे बोट दाखवून महामंडळ आपल्यातील कमतरता लपवू पाहत आहे हेच यातून दिसून येते. गेल्या तीन वर्षांत तब्बल ८० ते ८५ महापालिकेशी पत्रव्यवहार करणाºया राज्य परिवहन महामंडळाने अनेकदा पत्राद्वारे थेट प्रवाशांना वेठीस धरण्याचीच भाषा केलेली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे ३१ डिसेंबर, १ मे आणि १५ आॅगस्ट या दिवशी शहरातील बसेस संपूर्णपणे बंद करण्याचा इशारा देऊन झालेला आहे. त्याचप्रमाणे अनेक मार्गावरील बसफेºया अचानक बंद करून विद्यार्थी आणि कामगारांचे हाल करण्यात आले. महामंडळाच्या या निर्ढावलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण शहराची प्रवासी वाहतूक आजही विस्कळीत आहे. कोणतीही सेवा आणि सुविधांबाबत चर्चा करताना सामंज्यस्याने तोडगा काढण्यासाठीची चर्चा होऊ शकते. महामंडळाने अशी भूमिका दाखविणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात महापालिका अगदी ‘पहिली’पासून प्रवासी सेवेत उतरणार असल्यामुळे जर महामंडळाने काही बसेस आम्ही सुरू करतो, काही महापालिकेने सुरू कराव्यात, अशी भूमिका घेतली असती तर कदाचित शहराची बसेसेवा मूर्तरुपात येऊ शकली असती. परंतु महामंडळच या संपूर्ण प्रकारात सामंज्यस्याची भूमिका कधीच दिसली नाही. महामंडळाच्या वतीने पत्रव्यवहार करणाºया टेबलावरील कर्मचाऱ्यांकडूनदेखील वास्तव निरीक्षण नोंदविणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही.मनपाचे नाक दाबण्याचा प्रकारशहरातील बससेवा चालविण्यासाठी महापालिकेवर सातत्याने दबाव टाकणाºया महामंडळाने अनेकदा महापालिकेकडे आर्थिक तोटा भरून देण्याची मागणी केलेली आहे. तोटा देणार नसेल तर शहर बसेस चालवाव्यात आणि असा दबाव महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे. याशिवाय महापालिकेकडून वसूल करण्यात येणारे विविध प्रकारचे कर माफ करावेत, जसे तडजोडीची भूमिकादेखील महामंडळाने घेतलेली आहे. दोन्हीतून एक काहीतरी करा तरच बससेवेची जबाबदारी घेण्याचा पवित्रा महामंडळाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे.
प्रवासी वाढले तरीही नकारघंटा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:20 AM