शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
5
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
6
"मविआ नेत्यांकडून जनतेची दिशाभूल", नागपुरात देवेंद्र फडणवीस यांची प्रचार रॅली
7
५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
8
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
9
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
10
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
11
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
12
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
13
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
14
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
15
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
17
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
18
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
19
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
20
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!

नाशिक महापालिकेत बहुमत असूनही भाजप भीतीच्या छायेत

By किरण अग्रवाल | Published: November 17, 2019 1:08 AM

राज्यातील सत्ता समीकरणात तोंड पोळू पाहत असल्याने भाजप आता कोणताच धोका पत्करण्याच्या मानसिकतेत नाही. अडीच वर्षांपूर्वी नाशिक महापालिकेची सत्ता हस्तगत करताना या पक्षाने मनसेला खिंडार पाडले होते. आता महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर त्याच भीतीच्या छायेत हा पक्ष वावरताना दिसून येत आहे.

ठळक मुद्दे स्पष्ट बहुमत असतानाही आपल्याच नगरसेवकांवर एकप्रकारे अविश्वास महापौरपदाची निवडणूक येत्या २२ तारखेस ६६ पैकी केवळ ११ नगरसेवक खुद्द या पक्षाचे निष्ठावंत

सारांशस्वपक्षातील निष्ठावानांना दूर व उपेक्षित ठेवून परपक्षातून येणाऱ्या नवागंतुकांशी राजकीय चुंबाचुंबी करणे कसे अंगलट येऊ शकते याचा अनुभव राज्यात घेत असलेल्या भाजपला तशीच धास्ती नाशकातही सतावत आहे, म्हणूनच तर महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही आपल्याच नगरसेवकांवर एकप्रकारे अविश्वास दाखवित त्यांना महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर पर्यटनास धाडण्याची वेळ या पक्षावर ओढवली आहे.स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुस-यांच्या घरावर दगड मारायचे नसतात, हा तसा सामान्य संकेत. पण राजकारणात हे लक्षात कोण घेतो? त्यामुळे कोणत्याही निवडणुकांच्या काळात फोडाफोडीचे व आरोपांचे पीक अमाप येताना दिसते. यात कोणत्याही पक्षाचा अपवाद करता येऊ नये. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तर पक्षांतराचे प्रमाण इतके काही वाढले की मतदारांनाच त्याचा वीट आला आणि त्यांनी सत्तेसाठी कोलांटउड्या मारणा-या भल्याभल्यांचा ‘निकाल’ लावला. त्यामुळेच राज्यातील सत्तेचे त्रांगडे असे होऊन बसले की मुदत उलटूनही कुणास सत्तास्थापन करता न आल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली. यात ‘पुन्हा येईन’ म्हणणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजप चांगलीच पोळली जाताना दिसत आहे. परिणामी, राज्यातील हा अनुभव लक्षात घेता आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बांधबंदिस्ती करणे या पक्षाला भाग पडले आहे.नाशिक महापालिकेतील सत्तेच्या दुस-या आवर्तनातील महापौरपदाची निवडणूक येत्या २२ तारखेस होऊ घातली आहे. परंतु यात स्पष्ट बहुमत असतानाही संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी भाजपला आपल्या नगरसेवकांना शहराबाहेर हलवावे लागले आहे. सत्ताधा-यांची यामागील भीतीची मानसिकता खूप काही सांगून जाणारी असली तरी, का ओढवली अशी परिस्थिती याचा विचार करता त्याचे मूळ या पक्षाच्याच पायाशी आढळून आल्याखेरीज राहत नाही. महापालिकेतील गेल्या पंचवार्षिकमधील ‘मनसे’च्या सत्तेला सुरुंग लावताना भाजपने मोठ्या प्रमाणात भरतीप्रक्रिया राबविली होती. स्वपक्षात अनेक पक्षनिष्ठ, प्रामाणिक व सक्षम उमेदवार असताना या बाहेरून आलेल्यांना तिकिटे दिली गेल्याने त्यावेळी तात्कालिक यश लाभून प्रथमच महापालिकेत भाजपची स्वबळावर सत्ता आलीही; परंतु आता पक्षांतर्गतची ही ‘बाह्य’ शक्तीच या पक्षाला भिवविणारी ठरली आहे.नाशिक महापालिकेतील भाजपच्या निवडून आलेल्या ६६ पैकी केवळ ११ नगरसेवक खुद्द या पक्षाचे निष्ठावंत आहेत. बाकी ८० टक्के सर्व उधार उसनवारीचे, परपक्षातून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीत अनेक विषयांवर सत्ताधाºयांविरुद्ध स्वकीयच उभे राहिलेले पहावयास मिळाले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेऊनही पालिकेतील सत्ताधाºयांना आपले वेगळेपण प्रस्थापित करता आले नाही. नाशिक ही रामभूमी असल्याने महापालिकेतील कारभार जणू रामभरोसेच चालला. पण आता यापुढील उर्वरित कालावधीसाठीही तसेच घडून आले व पदाधिकारी निवड करताना योग्य निर्णय होऊ शकला नाही तर पुढच्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाणे अवघड ठरेल याची जाणीव भाजपला असावी. म्हणूनच कोणताही धोका न पत्करता त्यांनी स्वकीयांना बाहेर हलविण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो.विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी डावलले गेलेले बाळासाहेब सानप व राज्यातील सत्तासमीकरणातून दुरावलेली शिवसेना, अशा दोघांना नाशकातील महापौरपद खुणावणारे आहे. सानप भाजपचे शहराध्यक्ष राहिले असताना त्यांच्या नेतृत्वात या पक्षाला महापालिकेत सत्ता मिळविता आली होती. त्यामुळे आता सानप यांच्यासाठी भाजपला आपले उपद्रवमूल्य दाखवून देतानाच, ते शिवसेनेत गेलेले असल्याने त्या पक्षात आपले उपयोगमूल्य दाखवून देणेही गरजेचे ठरले आहे. भाजपचे अवघे सहा नगरसेवक हाती लागले तरी महापालिकेतील सत्तांतर होऊ शकणारे आहे. त्यामुळे भाजपास वाटणारी भीती साधार ठरावी. या भीतीत भर घालणारी बाब म्हणजे, पर्यटनास जाण्यास सानप समर्थक काही नगरसेवकांनी नकार दिला आहे. भाजपने काल जे पेरले, तेच यानिमित्ताने आज उगविलेले दिसून येत आहे. उद्या महापौर निवडीप्रसंगी नेमके काय होईल ते दिसेलच; पण बहुमत असणाºया भाजपची आजची भागम्भाग ही त्यांचाच नाकर्तेपणा स्पष्ट करणारी ठरून जावी हे मात्र नक्की.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूकBJPभाजपाMNSमनसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBalasaheb Sanapबाळासाहेब सानप