शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

मिठाई दुकानांच्या भट्ट्यांमुळे वाढला धोका

By admin | Published: November 21, 2015 11:46 PM

रहिवासी भयभीत : सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार

 इंदिरानगर :परिसरात नागरी वसाहतींमध्ये दिवसेंदिवस मिठाईची दुकाने वाढत असून, या दुकानांमध्ये असलेल्या भट्ट्या आणि गॅस सिलिंडर रहिवासी क्षेत्राला धोकादायक ठरत आहे. शहरात जलाराम आणि इंदिरानगर येथे राजसारथी सोसायटीत यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांनंतरही प्रशासनाला जाग आलेली नाही. परिणामी सुरक्षा नियम पायदळी तुडवले जात असल्याने कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रहिवाशांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती वाढल्या आहेत. इंदिरानगरसह विनयनगर, दीपालीनगर, समर्थनगर, साईनाथनगर, चेतनानगर, पांडवनगरी, राणेनगर, राजीवनगर अशा सर्वच भागात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था वाढल्या आहेत. त्यातील बहुतांशी इमारती या रहिवासी आणि व्यापारी स्वरूपाच्या आहेत. म्हणजेच इमारतींमध्येच तळमजल्यावर दुकाने काढण्यात आली आहेत. इमारतीत किराणा, इस्तरीचे दुकान, गॅरेज आणि अन्य इतर अनेक व्यवसाय वाढत आहेत. परंतु त्यातल्या त्यात सध्या चलनी ठरलेला मिठाईचा व्यवसाय फोफावत आहे. इमारतींमध्ये असलेल्या मिठाई विक्रीच्याच ठिकाणी मिठाई तयार करणारे अनेक व्यावसायिक आहेत. दुकानांतून ताजी मिठाई देण्यासाठी थेट विक्रीच्याच ठिकाणी ही व्यवस्था असल्याने त्याचा कदाचित दुकानदारांच्या व्यवसायाला लाभ होत असेल; परंतु अशी मिठाईची दुकाने अडचणीचीदेखील ठरत आहेत. मिठाई तयार करण्यासाठी व्यावसायिक भट्ट्या वापरल्या जातात. तसेच कमर्शियल सिलिंडर वापरले जातात. तेथेच तळण आणि अन्य प्रक्रिया केली जात असल्याने अनेकदा गरम वाफा आणि धूर निघत असतो. परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होतोच. परंतु दुकानाची विजेची व्यवस्था चांगली नसेल तर अंतर्गत केबल्स वितळून शॉट सर्किट होऊ शकतात किंवा तापलेल्या भट्टीमुळे सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो. नाशिक शहरात यापूर्वी दुकानांना अशाप्रकारे शॉटसर्किटमुळे आग लागून दुर्घटना घडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. शहरातील कॉलेजरोडवर जलाराम फरसाण मार्ट येथे अशा प्रकारची दुर्घटना घडल्यानंतर तेथेच विनापरवाना मिठाई तयार केली जात असल्याचा प्रकार महापालिकेच्या अग्निशमन दलाला आढळला होता. इंदिरानगरातील राजसारथी येथेही एका बेकरीच्या दुकानास भट्टीमुळेच आग लागली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली होती. परंतु हा प्रकार असाच सुरू राहिल्याने आता प्रशासन दुर्घटनेची वाट बघत आहे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.