वणी / पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. दुसरा संशयित फरार झाला आहे.याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून प्राप्त माहिती अशी, दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील कॅनॉल रस्त्यालगत देशी दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क कळवण व विभागीय भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करून याठिकाणी छापा घातला. घटनास्थळावरून या प्रकरणातील एक संशयित फरार होण्यात यशस्वी झाला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एम. बी. चव्हाण, व्ही. एम. माळी, वाय. आर. सायखेडकर, आर. आर. धनवटे, गणेश शेवगे, कैलास कसबे, अमीत गांगुर्डे, दीपक आव्हाड, विठ्ठल हाके, वंदना देवरे यांनी ही कारवाई केली.एक संशयित फरारअधिकाºयांनी त्या ठिकाणाहून ४२५ लिटर स्पिरिट व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई प्रकरणी संशयित पंढरीनाथ गोपीनाथ नाईकवाडे याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील रवींद्र राजू भालेराव हा फरार झाला आहे.
मद्याचा कारखाना उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:46 PM
वणी / पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून देशी दारू तयार करण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका संशयितास अटक करण्यात आली आहे. दुसरा संशयित फरार झाला आहे.
ठळक मुद्देवणी : दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त एका संशयितास अटक करण्यात आली