जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयातील चौंधाणे, जोरण परिसरातील नदी काठी, किकवारी या गावांमध्ये पोलिसांतर्फे दारूभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या परिसरात गावठी दारु मोठ्या प्रमाणात विक्र ी होत होती. परिसरातील किकवारी बुद्रूक येथील तरूण मंडळींनी ग्रामपंचायत कार्यालयात गावात गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्र ी होत होती. या गावातील काही जणांनी सर्वानुमते ग्रामपंचायत कार्यालयात ठराव मंजुर करून सदर निवेदन सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक वासुदेव देसले व तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना दिले.काही दिवसापुर्वीलोकमतने बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्टयात अवैध गावठी दारु विक्र ी होत असल्याचे वृत्त प्रसिध्द केली होते. याची गांभिर्याने दखल घेत सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक देवेंद्र शिंदे यांनी सोमवारी बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील गावठी दारुच्या भट्टया व साहित्य जमा जप्त केले. यावेळी सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक देवेंद्र शिंदे, पोलीस नाईक पंकज सोनवणे, जय्ािसंग सोळंके, निलेश पवार, राहूल शिरसाठ, कृष्णा गोडसे ,पोलीस शिपाई योगेश साळुंखे यांनी कार्यवाही केली.
सटाणा तालुक्यात दारूभट्टया उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 2:07 PM