शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
4
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
5
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
6
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
7
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
8
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
9
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
10
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
11
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
13
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
15
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
16
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
17
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
18
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
19
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
20
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."

घरफोडीतील गुन्हेगार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2019 1:57 AM

काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित शंकर नागेश पुजारी (रा. शनिमंदिरामागे, पेठरोड) याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदोन गुन्ह्यांची उकल : दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक : काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित शंकर नागेश पुजारी (रा. शनिमंदिरामागे, पेठरोड) याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित शंकर पुजारी याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता मुंबई नाका व ओझरमधील घरफोडीची त्याने कबुली दिली आहे. दरम्यान, पथकातील कर्मचारी विशाल काठे यांना संशयित पुजारी हा पेठफाटा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, परिसरात सापळा रचण्यात आला. ओझरमध्येही संशयित गणेश बाजीराव केदारे याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.अट्टल गुन्हेगार; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हेसंशयित पुजारी व केदार हे अट्टल गुन्हेगार असून, गेल्यावर्षी गंगापूर परिसरात केलेल्या घरफोडी प्रकरणी त्यांना आॅगस्ट महिन्यात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून ६६ हजार रु पयांचा मुद्देमालही जप्त केला होता. तसेच तपासात संशयितांनी सरकारवाडा, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोड्यांसारखे गुन्हे केल्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून ४ लाख ३३ हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. संशयित पुजारी हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. त्यानंतर पुन्हा घरफोडी केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. केदारे हा अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक