शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

चोरी गेलेल्या जीपचा लागला शोध

By admin | Published: January 31, 2016 10:37 PM

चोरी गेलेल्या जीपचा लागला शोध

वणी : दोन दिवसांपूर्वी चोरी झालेल्या पिकअप जीपचा शोध जागरूक इसमामुळे लागला असून, गुजरात राज्याच्या हद्दीत बेवारस स्थितीत रस्त्याच्याकडेला सदर पिकअप आढळून आल्याने जीपमालकाचा जीव भांड्यात पडला आहे. जगदंबादेवी मंदिर परिसरातील ब्राह्मण गल्लीत केटरिंगचा व्यवसाय करणारे लादुराम जोशी यांच्या मालकीची पिकअप (क्र. एमएच ४/डीएक्स ३५९१) २९ जानेवारी रोजी घरालगत लावली. रात्रीच्या सुमारास बेमालूमपणे अज्ञात चोरट्यांनी जीप लांबविल्याचे जोशी यांच्या लक्षात आले. पोलिसांकडे याबाबत तक्र ार करण्यात आली. सदर जीप वणी-सापुतारा रस्त्यावरील माळेदुमाला परिसरातील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबली; मात्र या ठिकाणी डिझेल न मिळाल्याने ही जीप सुसाट वेगाने तेथून निघून गेली. या ठिकाणी असणाऱ्या चंद्रकांत काकड यांनी ही जीप ओळखली व शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी ३० तारखेला सकाळी जोशी यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. वणी-सापुतारा रस्ता मित्रांसमवेत जोशी यांनी पिंजून काढला असता गुजरात राज्याच्या प्रवेश सीमेजवळील सीसीटीव्ही फुटेज तेथील अधिकारी यांच्या मदतीने तपासले असता ही जीप गुजरात राज्यात गेल्याचे आढळून आले. या जीपचा माग काढला असता सापुतारा या पर्यटनस्थळापासून रस्त्याच्या कडेला ही जीप आढळून आली. डिझेल संपलेल्या स्थितीत ही जीप होती. पोलिसांना ही माहिती देण्यात आली. दरम्यान काही कालावधीपूर्वी संतोष साखला यांचीही पिकअप अशाच पद्धतीने चोरी गेली होती. (वार्ताहर)