सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्प कडून तेलपंप व पीव्हीसी पाईप मंजूर असूनही अद्याप न मिळाल्याने सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थीनी आमरण उपोषणचा ईशारा दिला आहे.आदिवासी विकास प्रकल्प कळवण व नाशिक प्रकल्प यांचेकडे तेल पंप व पीव्हीसी पाईप मंजूर असून सन 2014 - 15 चे पीव्हीसी पाईप खरेदी करण्यासाठी यापूर्वी निविदा क्र .1659 प्रसिध्द करण्यात आली होती. मात्र सदर ई निविदा तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली होती. त्यानंतर दूसरी ई निविदा क्र .2336प्रसिध्द करण्यात आली होती. या निविदेमधील एका निविदेधारकाने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. दि.12 जुलै 2016 रोजी निविदधारकाने सादर केलेली रिट याचिका मागे घेतली. त्यानुसार निविदेतील पात्र निविदधारक स्याम्पल तपासणी नंतर खरेदीची पुढील कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु नाशिक प्रकल्पचे 972 लाभार्थी तर कळवण प्रकल्पाचे 901 लाभार्थी असे एकूण 1873 तेल पंप संचाचे लाभार्थी वाटप होणे आवश्यक होते. मात्र हे वाटप पूर्णपणे झालेले नाही. सदर वाटप त्विरत न झाल्यास 12 सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालय नाशिक येथे सर्व लाभार्थीसह आमदार नरहरी झरिवाळ, आमदार निर्मलाताई गावित, आमदार जे. पी. गावित हे आमरण उपोषणाला बसतील असा ईशारा देण्यात आला याआहे. ठाणगावचे सरपंच गोपाळराव धुम यांनी याबाबत आदिवासीविकास मंत्री विष्णू सावरा यांना लेखी निवेदन दिले असून त्यात लाभार्थीना त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी किंवा आदिवासीविकास प्रकल्पनेच पाईप खरेदी करून लाभार्थ्यांना वाटप करावेत असे म्हटले आहे.
आदिवासी प्रकल्प कडून पीव्हीसी पाईप वाटपासाठी खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 6:15 PM
सुरगाणा : आदिवासी विकास प्रकल्प कडून तेलपंप व पीव्हीसी पाईप मंजूर असूनही अद्याप न मिळाल्याने सदर योजने अंतर्गत सर्व लाभार्थीनी आमरण उपोषणचा ईशारा दिला आहे.
ठळक मुद्देलाभार्थींचा आयुक्त कार्यालय येथे आमरण उपोषणाचा ईशारा