लोकमत न्यूज नेटवर्कनगरसूल : जागतिक बॅँकेने गौरविलेल्या आणि राज्यात यशस्वी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. नफ्यात चालणाºया या योजनेचे सध्या ४८ लाख रुपये ग्रामपंचायतींकडे थकले असून, ग्रामपंचायतींनाही वसुलीत अडचणी निर्माण होत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे.येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजना आजही राज्यातील यशस्वी योजना म्हणून गणली जाते. या योजनेवर परिसरातील अनेक गावांची तहान भागविलीजाते़ जागतिक बँकेने केलेल्या सर्व्हेत सर्वाधिक यशस्वीपणे चालणारी ही योजना मानली गेली आहे. तेलंगणातील समितीकडूनही या योजनेचा अभ्यास झाला आहे. तब्बल ३५ च्या वर गावे टँकरमुक्त करून अखंडितपणे ही योजना शासनाच्या एक रु पयाही अनुदान न घेता नफ्यात सुरू आहे. भर उन्हाळ्यात व दुष्काळातही या योजनेने अर्धा तालुका टँकरमुक्त ठेवला. मात्र कोरोनाच्या महामारीत झालेल्या लॉकडाऊनमध्ये योजनेची काहीशी वाताहत झाली. त्यामुळे योजनेचे ग्रामपंचायतींकडे तब्बल ४८ लाख रु पये थकले आहेत. ग्रामपंचायतींची पाणीपट्टी आल्याने पाटबंधारे विभागाला २५ लाख रु पयांचे देणेप्रलंबित आहे. धुळगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, एरंडगाव, जळगाव नेऊर, मानोरी, नगरसूल, सायगाव, सुरेगाव रस्ता, अंदरसूल, उंदीरवाडी, आडगाव चोथवा, अंगणगाव, निमगाव मढ, अनकुटे, विसापूर व इतर ग्रामपंचायतींकडे मोठी थकबाकी आहे. त्यामुळे या गावासह परिसरात पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे़ सव्वाचार लाख रुपये वीजबिल ३८ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना समितीचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार व प्रशासनानेही ग्रामपंचायतींना पत्र देऊन थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या आहेत. नफ्यातील योजनेला ग्रहण लागल्याने योजना सुरळीत चालण्यासाठी ग्रामपंचायतीने थकबाकी भरणा करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. पालखेडचे व वीजबिलाचे देणे बाकी आहे आणि येणे ४८ लाख रु पये असून, योजना आजही नफ्यातच आहे, मात्र थकबाकीमुळे अर्थचक्र बिघडले आहे.सुरुवातीला ३८ गावांपुरतीच मर्यादित असलेल्या या योजनेला आता नगरसूल रेल्वे, अंकाई रेल्वे, पोलीस वसाहत, औद्योगिक वसाहतीसह संस्था व गावे जोडल्याने सद्यस्थितीत ५९ गावांना योजनेचे पाणी पोहोचत आहे. लॉकडाऊनमुळे पाणीपट्टी वसुलीवर परिणाम झाला आहे. योजनेचा खर्च पाहता ग्रामपंचायतींनी वसुली करून आमची पाणीपट्टी द्यावी. आमच्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने सॅनिटायझर खरेदी करून वापरले आहेत.- मोहन शेलार, उपाध्यक्ष, पाणीपुरवठा योजना समिती वर्षांनुवर्षे आम्ही पाणीपट्टी भरत आहोत, मात्र लॉकडाऊनमुळे गेले तीन महिने ग्रामस्थांकडे वसुलीसाठी जाता आले नाही. नागरिक अडचणीत असल्याने वसुलीसाठी तगादा करता येत नाही. ग्रामपंचायती पाणीपट्टी भरणारचआहे.- प्रसाद पाटील, सरपंच, नगरसूल
पाणीपुरवठा योजनांचे बिघडले अर्थचक्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 8:50 PM
नगरसूल : जागतिक बॅँकेने गौरविलेल्या आणि राज्यात यशस्वी योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेला लॉकडाऊनचा फटका बसला आहे. नफ्यात चालणाºया या योजनेचे सध्या ४८ लाख रुपये ग्रामपंचायतींकडे थकले असून, ग्रामपंचायतींनाही वसुलीत अडचणी निर्माण होत असल्याने थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे.
ठळक मुद्देग्रामपंचायतींकडे थकबाकी : येवल्यातील ३८ गाव पाणीयोजना अडचणीत; वसुली ठप्प