सिन्नर : शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्याचा निर्धार विंचूर दळवी येथील गाव स्तरीकरण कोरोना प्रतिबंधक उपयोजना समितीच्या बैठकीत करण्यात आला.भैरवनाथ मंदिर परिसरात ही बैठक पार पडली. गावातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान सुरू राहतील, सलून व्यवसाय असेल. कोरोनाबाधित क्षेत्रातून पास घेऊन व विनापास येणाऱ्यांना सक्तीने १४ दिवस शाळाखोलीत संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक राहील, विनापरवानगी येणाऱ्यांवर साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल, गावामध्ये एण्ट्री पॉइंटला चेकपोस्ट बसवून भाजीपाला वाहतूक करणाºया वाहनांना सॅनिटाइझ करणे बंधनकारक करण्यात आले. पिकअपसह छोटी गाडी ५० रुपये व मोठी गाडी १०० रुपये असे शुल्क आकारून ही जंतुनाशक फवारणी करण्यात येईल.यावेळी समितीचे उपाध्यक्ष कैलास दळवी, ग्रामपंचायत सदस्य जयराम दळवी, शांताराम दळवी, दत्तात्रय शेळके, विश्राम शेळके, तंटामुक्त समितीचे वामन दळवी, पोलीसपाटील रमेश अभंग, तलाठी कविता गांगुर्डे, आरोग्यसेवक नीलेश चौधरी, शुभांगी शिंदे, बाळासाहेब पांडे, श्रीमती काळे, रेश्मा गोवर्धने, गोरख भोर, सुरेश भोर, प्रकाश दळवी, भाऊराव पवार आदी उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे विविध परिपत्रकांचे व आदेशांचे वाचन केले. गावाबाहेर ये-जा करणाºया वाहनचालकांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, तसेच लग्न, दशक्रिया विधी, अंत्यविधी आदी धार्मिक कार्यक्रम घरातील व भाऊबंदकीतच करुन घेण्याचे आवाहन गिरी यांनी केले.
नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 10:17 PM
शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाचा प्रतिबंध करण्याचा निर्धार विंचूर दळवी येथील गाव स्तरीकरण कोरोना प्रतिबंधक उपयोजना समितीच्या बैठकीत करण्यात आला.
ठळक मुद्देविंचूर दळवी : गावस्तरीकरण कोरोना प्रतिबंधात्मक समितीची बैठक