नाशिक : बदलत्या जीवनशैलीमुळे इंटेरिअर डिझाइनचे महत्त्व वाढले असून, भारतीय इंटेरिअर डिझाइन कलासंवर्धनाच्या निर्धाराची गरज असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ इंटेरिअर डिझाइनर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप जाधव यांनी केले आहे.नाशिक चॅप्टरच्या नूतन पदाधिकाºयांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी वास्तुविशारद हिरेन पटेल यांच्यासह नाशिक चॅप्टरचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नाशिक चॅप्टरचे नूतन अध्यक्ष राकेश लोया यांनी मावळते अध्यक्ष हेमंत दुगड यांच्याकडून पदभार स्वीकारला. तर रुपाली जायखेडकर यांच्याकडे तरन्नुम काद्री यांनी सचिवपदाचा पदभार सोपवला. या पदग्रहण सोहळ्यात हेमंत दुगड यांनी त्यांच्या कार्यकाळातील कार्य अहवालाचे वाचन केले. राकेश लोया यांनी, आगामी कालावधीत नाशिक जिल्ह्यासह शहरासाठी इंटेरिअर डिझाइनच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञान संवर्धनावर विशेष भर दिला जाईल, असा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नाथे व सुरुची रणदिवे यांनी केले.
इंटेरिअर डिझाइन कलासंवर्धनाचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:51 AM