राज्यात फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ च्या तरतुदीनुसार अंमलबजावणी सुरू झाली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपात्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला असून, ब्रेक द चेन अंतर्गत काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. शासनाने परिसरातील देवस्थानांचे प्रवेशद्वार बंद करण्याचे सुचित केल्याने कोटमगाव व बोकटे येथील देवस्थान दि. ३० एप्रिलपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत.
फोटो : ०८ येवला १
बोकटे येथील श्री भैरवनाथ मंदिर प्रवेशद्वार कुलूपबंद करतांना पदाधिकारी व कर्मचारी.
===Photopath===
080421\08nsk_35_08042021_13.jpg
===Caption===
बोकटे येथील श्री भैरवनाथ मंदिर प्रवेशद्वार कुलूपबंद करतांना पदाधिकारी व कर्मचारी.