पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, जिरवाडी, अस्वलीपाडा, माळेदुमाला, अंबानेर, पिंपरी अंचला, हस्ते दुमाला या परिसरात काल सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारीही पावसाचा जोर कायम आहे. पांडाणे, अहिवंतवाडी, अंबानेर, चामदरी, गोलदरी, अस्वलीपाडा, माळेदुमाला, पिंपरी अंचला, कोल्हेर, चौसाळे, जिरवाडे या परिसरात शनिवारपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे चोहीकडे पाणीच पाणी झाले आहे. भाताच्या लागवडीला वेग आला आहे. नागली, भुईमूग आदि पिकांची पेरणी झाली असून आता टमाटा, कोबी, मिरची या पिकाच्या लागवडीला वेग आला आहे. परंतु शनिवारपासून जोरात पावसाला सुरुवात झाली होती. रविवारी देवनदीला सकाळपासूनच महापुराचे स्वरूप आले आहे. त्यामुळे ओझरखेड येथील धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी परिसरात व पांडाणे परिसरात पावसामुळे बळीराजा सुखावला आहे .
पांडाणे येथील देवनदीला पूर
By admin | Published: July 10, 2016 10:31 PM