येवला : गीता परिवार येवला आयोजित बालसंस्कार शिबीराचा समारोप आज मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या अभ्यासपुर्ण विवेचनाने येवला शहरात प्रथमच मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा प्रेरित मार्गदर्शनपर शिबीराचा समारोप संपन्न झाला. शिबिराच्या समारोपात प्रारंभी राष्ट्रकल्याण प्रार्थना झाली. प्रास्ताविक अविनाश वरोडे यांनी केले. यावेळी मुलांवर अपेक्षांचे ओझे न ठेवता त्यांचा सर्वांगीण विकास कसा साधावा, कुटूंबातील सुसंवाद व मत्सरघातमुक्तीचे उपाय यावर मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या साधक सौ. अनिता पाटील यांनी पालकांना मार्गदर्शन केले. मुलांच्या बुद्धिवर्धन या व्याख्यानाला समांतर त्यांच्या पालकांकरता बालसमस्या आण िकुटूंबसुखवर्धन या विषयावर मुलांच्या चौफेर वाढीचा हा काळ,वर्तनातले बदल होण्याचाही हाच काळ,एका बाजूने पालकांच्या अपेक्षा आण िदुसर्?या बाजूने स्पर्धेचा ताण यासह उमलण्याच्या उंबरठ्यावर असणार्?या या मुलांना कसे समजावून घ्यायचे याची माहिती देण्यात आली . शिक्षणासोबतच स्वभाव व आरोग्य हा समतोल कसा साधायचा,तसेच मुलांच्या अनेक समस्यांवर वैज्ञानिक व मानसशास्रीय उपायबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वतंत्र सत्रात सौ. सुरेखा कानवडे यांनी मुलांना कृतज्ञतेचे महत्व, अवघड विषयांच्या अभ्यासाची मनशक्ती संशोधित बुद्धीवर्धन पध्दती, एकाग्रता साधण्याचे उपाय यावर मार्गदर्शन केले.पालकांची स्ट्रोबोस्कोप या यंत्राद्वारे सामुहिक चाचणी देखील घेण्यात आली. पालकांनी येवला शहरात प्रथमच झालेल्या मनशक्ती प्रयोगकेंद्राच्या या कार्यक्र मात विविध अभ्यासवर्ग, प्रयोग साहित्य यांचीही उत्सुकतेने माहिती घेतली. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यांवर शाश्वत समाधान मिळवण्याकरता विज्ञाननिष्ठ उपाय योजना नि:स्वार्थपणे सांगणारे, व्यक्तीकल्याण ते विश्वकल्याण अशी व्यापक तत्वप्रणाली असणारे हे मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा गेली पन्नास वर्षे जन्मपूर्व संस्कार ते मृत्युपश्चातचे विज्ञान अशा विविध विषयांवर संशोधन करीत आहे.बुद्धिवर्धन अभ्यासपद्धती, ताणमुक्त यश या विषयावर बोलतांना सौ पाटील यांनी नकळत अभ्यासाचा ताण पडतो, असे संशोधन सांगते. मग मुलांची काळजी घ्यायलाच हवी. ही काळजी अभ्यासापुरती नव्हे; तर इतरही अनेक बाबतीत घ्यायला हवी. ताणमुक्त अभ्यास यशाच्या वैज्ञानिक पद्धती, एकाग्रता शक्ती वाढवण्याच्या सोप्या पद्धती,आयुष्यातील उच्च ध्येय गाठण्यासाठी शक्ती नियोजन कसे करावे .स्वावलंबनाचे महत्व याबाबत अनेक दाखले सौ पाटील यांनी दिले.
अपेक्षांचे ओझे न ठेवता मुलांचा विकास साधावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:12 AM