शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सामूहिक यंत्रणा विकसित करण्यासाठी ‘कांदा क्लस्टर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:41 AM

नाशिक जिल्ह्यात ‘आॅपरेशन ग्रीन’ या योजनेंतर्गत कांदा क्लस्टर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत कांदा पिकासाठी लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत आवश्यक त्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा सरकारचे धेय्य आहे. त्यासाठी शासनाकडून ७० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. परंतु, अनुदान उपलब्ध होणार असले तरी क्लस्टरला कार्यरत करण्यासाठी शंभर टक्के क्षमता असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी सोसायट्या, कंपनीसारख्या संस्थांनाच या योजनाचा लाभ घेता येणार आहे.

ठळक मुद्देकेंद्राचे ७० टक्के अनुदान : संपूर्ण आर्थिक क्षमता असलेल्या संस्था, कंपन्यांनाच घेता येणार लाभ

नाशिक : जिल्ह्यात ‘आॅपरेशन ग्रीन’ या योजनेंतर्गत कांदा क्लस्टर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत कांदा पिकासाठी लागवडीपासून ते निर्यातीपर्यंत आवश्यक त्या सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याचा सरकारचे धेय्य आहे. त्यासाठी शासनाकडून ७० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. परंतु, अनुदान उपलब्ध होणार असले तरी क्लस्टरला कार्यरत करण्यासाठी शंभर टक्के क्षमता असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी सोसायट्या, कंपनीसारख्या संस्थांनाच या योजनाचा लाभ घेता येणार आहे.केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाने जाहीर केलेल्या ‘आॅपरेशन ग्रीन’ या योजनेंतर्गत देशभरात फळे व भाजीपाला यांचे भाव नियंत्रित रहावे व गुणवत्ता वाढावी या उद्देशाने महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशासारख्या राज्यांमध्ये काही ठिकाणी खाद्यान्न प्रक्रिया क्लस्टर सुरू करण्याची घोषणा केली असून, यात नाशिकमध्ये रब्बी कांदा पिकासासाठी क्लस्टर सुरू करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. देशभरात वर्षभर बटाटे, कांदे आणि टमाटा यांच्या दरातील चढउतार पहायला मिळतो. याचा फटका कधी ग्राहकांना, तर कधी शेतकऱ्यांना बसत असतो. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून, कांदा, बटाटे आणि टमाट्याचा पुरवठा आणि उपलब्धता व गुणवत्ता निश्चित व्हावी यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या ‘आॅपरेशन ग्रीन’ची घोषणा केली होती. त्यानुसारच नाशिकमध्ये कांदा क्लस्टर सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, महाराष्ट्रात नाशिकमध्ये रब्बी पिकासाठी, तर कर्नाटकातील गडग आणि धारवड येथे खरीप कांद्यासाठी, गुजरातमधील भावनगर आणि अमरेलीसोबतच बिहारमध्ये नालंदा येथे कांदा क्लस्टर सुरू करता येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी, राज्य कृषी खरेदी-विक्री संघ, सहकारी सोसायटी, कंपनी, स्वयंसहाय्यता समूह, खाद्यान्न प्रक्रिया उद्योग, सेवा पुरवठा दार, लॉजिस्टिक आॅपरेटर यांच्यासह केंद्र व राज्य सरकारी संस्था अशाप्रकारचे क्लस्टर सुरू करून शकणार आहे.एकत्रित सुविधा देण्याचा प्रयत्नकांदा क्लस्टरच्या माध्यमातून सामूहिकपणे शेतीचा विकास साधण्याचे धेय्य असून, क्लस्टरमध्ये उत्तमोत्तम यंत्रणा उभी करून प्रक्रिया व संशोधन उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न आहे. यात उत्कृष्ट बियाण्यांची निर्मिती व संशोधन, रोपवाटिका, लागवडपूर्व मशागत, लागवड आणि लागवडीपश्चात आवश्यक मार्गदर्शन, पाणी परीक्षण, माती परीक्षण आदी सुविधांसोबतच साठवण सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेच्या एकत्रित सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी सांगितले.कांदा क्लस्टरच्या विकासासाठी शासनाक डून ७० टक्के अनुदान मिळणार आहे, मात्र अनुदानाची कमाल मर्यादा ५० कोटी रुपयांपर्यंच निश्चित करण्यात आली आहे. परंतु, संपूर्ण गुंतवणुकीची क्षमता असलेल्या गुंतवणुकदारांनाच हे क्लस्टर सुरू करता येणार आहे, त्यासाठी अर्जकर्त्या संस्थेस अथवा कंपनीस अर्थसहायक करणाºया संस्थेचे अथवा बँकेचे तसे पत्र प्रस्तावसोबत सादर करावे लागणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीonionकांदा