शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पेसातून मिळाली ‘विकासा’ला चालना, दोन वर्षांत पाचशे कोटींची तरतूद

By admin | Published: August 09, 2016 12:34 AM

जागतिक आदिवासी दिन विशेष : राज्यातील २,८७३ ग्रामपंचायतींना थेट निधी

 गणेश धुरी नाशिकस्वातंत्र्योत्तर काळापासून अडगळीत पडलेल्या शंभर टक्के आदिवासी ग्रामपंचायती ‘पेसा’चा कायदा लागू झाल्यामुळे विकासाचे एक नवीन दालन खुले झाले. पेसा कायदा लागू झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांत राज्यातील १३ जिल्ह्णांतील ६० तालुक्यांतील २,८७३ ग्रामपंचायतींना पाचशे कोटीहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.इतकेच नव्हे तर आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने अनुदानित व शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये संयुक्त आश्रमशाळा व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, समितीच्या अध्यक्षपदी आदिवासी पालकांचीच निवड करण्यात आली आहे.आदिवासी विशेष घटक योजनांसाठी (टीसीपी) राखीव ठेवण्यात येणाऱ्या एकूण निधीतून तब्बल ५ टक्के रक्कम थेट शंभर टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या पेसांतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या गरजा ओळखून स्थानिक पातळीवर विकास योजना राबविण्यासाठी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. राज्यातील अनुसूचित जमाती क्षेत्रातील ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड व पुणे या १३ जिल्ह्णांतील ६० तालुक्यांमध्ये असलेल्या २,८७३ ग्रामपंचायतींतर्गत जवळपास ५९७९ गाव/वाडे/पाडे यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या कोष खात्यामध्ये निधी थेट वर्ग करण्यात येत आहे. या वितरित केलेल्या निधीची सर्वस्वी जबाबदारी ग्रामसभेवर असून, ग्रामसभा कोष समितीमार्फत निधीचे सर्व व्यवहार करावयांचे आहेत. या अभियानातून निधीतून करावयाची कामे निवडणे, निधीच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देणे एवढेच नव्हे तर ३ लाखांच्या आतील कामांना तांत्रिक मान्यता देणे हे सर्व अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. या निधीतून चार प्रकारची कामे ग्रामपंचायतींना करता येणार आहेत. त्यात पायाभूत सुविधा पुरविणे, त्यात दफनभूमी, गुदाम, गावांचे अंतर्गत रस्ते, संबंधित पेसा गावातील ग्रामपंचायत शाळा, वनहक्क अधिनियम व पेसा कायद्याची वैशिष्ट्ये या प्रकारात पेसासंदर्भातील माहितीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण, सामायिक जमिनी विकसित करून देणे, मत्स्यपालन व्यवसाय व मत्स्य बियाणे खरेदी, तसेच तिसऱ्या प्रकारात आरोग्य व शिक्षणविषयक बाबींवर ग्रामपंचायतींना खर्च करता येणार आहे. त्यात सांडपाणी व्यवस्थापन, भूमिगत गटारे, ई-लर्निंग आणि चौथ्या प्रकारात वनीकरणाची कामे करता येणार आहेत. त्यात जलसंधारण, वनतळी, वन्यजीवन पर्यटन या बाबींचा समावेश आहे.