मालेगाव : (अतुल शेवाळे ) कोरोना प्रादुर्भावाचा फटका थेट महापालिकेच्या तिजोरीला बसला आहे शासन अनुदानित विकासकामांना अडचण येणार नसली तरी महापालिका करीत असलेल्या विकास कामांना निधीअभावी खीळ बसणार आहे महापालिकेची भिस्त आता केवळ दर महिन्याला येणाऱ्या जीएसटी अर्थात स्थानिक स्वराज्य करा वरच अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेला भविष्यात सुमारे २० ते २२ कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत तशा उपाय योजना देखील महापालिका प्रशासनाकडून केल्या जात आहेत..-----------------कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम बाजारपेठा सह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीवर झाला आहे. सध्या महापालिकेला महिन्या काठी जीएसटीतुन केवळ १४ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे यातूनच महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतन अदा केले जात आहे इतर खर्च देखील या निधीतून भागविला जात आहे.---------------------१महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाल्यामूळे मनपाच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. पुढील दीड ते दोन वर्ष आर्थिक परिस्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे मनपा आर्थिक डबघाईला येणार आह.े तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत. त्यासाठी सुमारे २० ते २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.२ या खर्चाचा ताळमेळ कसा बसवायचा असे आव्हान महापालिका प्रशासना पुढे उभे ठाकले आहे. परिणामी शहरातील विकासकामांना कात्री लागणार आहे रस्ते, गटार, वीज ही कामे थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासन अनुदानित विकासकामांना अडचणी येणार असल्या तरी मूलभूत सुविधांसाठी महापालिकेला कसरत करावी लागणार आहे.३मनपा प्रशासनाने ३८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते, याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. आगामी काळात महासभेपुढे अंदाजपत्रक ठेवण्यात येणार असून, महासभा यात विकासकामे सुचविणार आहे. दरम्यान, शासनाने महापालिकेला विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी नगरसेवकासह नागरिकांकडून केली जात आहे.------------------------कोरोना आजाराच्या पूर्वी प्रशासनाने हाती घेतलेली कामे पूर्ण करावीत. नवीन अंदाजपत्रकाबाबत धोरण निश्चित करावे महत्वाचे विकासकामे मार्गी लावावीत शासनाने रस्ता कामांसाठी २५ कोटी रुपये मंजूर केली आहेत- निलेश आहेर, उपमहापौर, मालेगाव.
-------------------------------------कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाचे सर्वच अधिकारी व कर्मचारी कामाला लागले होते.यामुळे मालमत्ता कर वसुलीवरपरिणाम झाला.मात्र वसुलीचे नियोजन करण्यात आले आहे.उत्पन्न वाढी साठी प्रयत्न केले जात असून विकास कामे मार्गी ाागतील.- अनिल पारखे, सहाय्यक आयुक्त, मालेगाव