शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

नाशिक क्रिकेटचा विकास ही सामूहिक जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 11:24 PM

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत खेळाडू पॅनलने सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलने न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि खेळाडू पॅनलवर अकार्यक्षमतेचा आरोपही केला. प्रचाराचा कोणताही गाजावाजा न करताही खेळाडू पॅनलने मात्र परिवर्तनचा सरळ सरळ पराभव केला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू पॅनलचे प्रमुख आणि ...

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीत खेळाडू पॅनलने सर्वच जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व राखले आहे. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी परिवर्तन पॅनलने न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि खेळाडू पॅनलवर अकार्यक्षमतेचा आरोपही केला. प्रचाराचा कोणताही गाजावाजा न करताही खेळाडू पॅनलने मात्र परिवर्तनचा सरळ सरळ पराभव केला. या विजयाच्या पार्श्वभूमीवर खेळाडू पॅनलचे प्रमुख आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्याशी साधलेला संवाद.२००३ पासून नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा कारभार सांभाळत असताना पंधरा वर्षांनंतरही पारदर्शकतेचा मुद्दा विरोधी गटाकडून उपस्थित केला जातो. यामुळे विश्वास टिकविण्याचे आव्हान वाटते का?सन २००३ पासून ते आजवर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रगतीसाठी काय केले आणि आणि किती काम उभे राहिले हे सदस्य,सभासदांच्या समोर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रश्न नाही. परंतु हे आरोप असे लोक करतात की ज्यांना क्रिकेटचे काम आणि त्याबाबतचा अनुभव नाही. ज्यावेळी असे आरोप केले जातात त्यावेळी आरोप करणाऱ्यांचेच खरे स्वरूप बाहेरयेते. या निवडणुकीतही तेच झाले. आरोप करणे सोपे असते, परंतु त्यासाठी काहीतरी धागा असावा लागतो. विरोधकांकडे असा कोणताही मुद्दा नसल्याने मतदारांनी त्यांना जागा दाखविली असे म्हणता येईल.निवडणुकीतील या यशामुळे आपल्यावरील आणि पॅनलवरील विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे. यापुढील कामकाज कशा पद्धतीचे असेल?निवडणूक ही निवडणुकीसारखी लढायची असते. निवडणुकीनंतर क्रिकेटच्या विकासाचा मुद्दाच प्राधान्यावर असतो. असोसिएशनचे सर्वच सभासद क्रिकेटच्या विकास प्रक्रियेचा एक भाग आहेत. क्रिकेटच्या विकासासाठी हे सर्व घटक महत्त्वाचे असतात. चांगल्या कामासाठी प्रसंगी विरोधकही क्रिकेटच्या हिताचाच निर्णय घेऊन असोसिएशनला सहकार्य करतील. शेवटी नाशिक जिल्हा क्रिकेटचा विकास हा महत्त्वाचा असतो. निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीनंतर संपुष्टात येतात क्रिकेटसाठी हे सर्व लोक आमच्याबरोबरच राहतील.शहराबरोबरच तालुका आणि ग्रामीण भागातील क्रिकेटही तितकेच महत्त्वाचे आहे. याविषयी काय व्हिजन आहे.नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्हा पातळीवरील क्रिकेटच्या विकासासाठी भरीव काम केले आहे. असोसिएशनने आखलेल्या रोड मॅपनुसार शहरातील सेंटर्सची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील विविध भागांतून खेळाडू नाशिक गोल्फ क्लबवर येतात. शहरातील उपनगरांमध्ये सेंटर्सची संख्या वाढविण्यात येईल. तालुक्यापर्यंत असोसिएशनचा विस्तार झाला आहेच तो अधिक बळकट केला जाणार आहे. तालुक्यात क्रिकेटचे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले जाईल. असोसिएशनशी संबंधित पदाधिकारी, क्लब, आजीवन सदस्य, सभासद आणि खेळाडूंमुळेच नाशिकच्या क्रिकेटला राज्य, राष्टÑीय पातळीवर ओळख मिळाली आहे. म्हणूनच नाशिकला बेस्ट क्रिकेट असोसिएशनचा महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनचा अवॉर्ड मिळालेला आहे.आगामी काळात नाशिकमध्ये मोठ्या क्रिकेट मॅचेस बघण्यास मिळू शकतात का?निश्चितच, त्यासाठीची सज्जता असोसिएशनने केलेली आहे. अजूनही आधुनिक तंत्रपद्धतीचा वापर करण्यात येत आहे. आजवर नाशिकने अकरा रणजी सामन्यांचे यशस्वी आयोजन केलेले आहे. तसेच एमसी आय आणि बिसीसीआयच्या विविध वयोगटांतील सात स्पर्धादेखील नाशिक क्रिकेट असोसिएशन आयोजन करीत असते. नाशिकमध्ये रणजी सामने घेण्याची पूर्ण क्षमता असून, नाशिकला रणजी सामने मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे.  (शब्दांकन : संदीप भालेराव)

टॅग्स :Cricketक्रिकेट