सुरगाणा : (श्याम खैरनार) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान सुरगाणा नगरपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली आहे. पूर्वीची मंजूर विकासकामे वगळता नवीन विकासकामांना मंजुरी मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सुरगाणा येथील मोठा भरणारा आठवडे बाजार बंद असल्याने बाजार कर, दैनंदिन करवसुली त्याचप्रमाणे घर आणि पाणीपट्टी, बांधकाम, दिवाबत्ती आदी कामांच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. सुरगाणा नगरपंचायतीला दरवर्षी सहा ते साडेसहा लाख रु पये उत्पन्न मिळते. चालू वर्षी लॉकडाऊनमुळे केवळ ७३ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. आधीच्या तुलनेत शंभर टक्के मिळणाºया उत्पन्नापैकी केवळ १२ ते १५ टक्के एवढीच कर वसुली २०१९ ते २०२० या चालू आर्थिक वर्षात झाली आहे. बांधकाम कर, बाजार कर, दैनंदिन करवसुली कमी प्रमाणात असल्याने कर संकलन वाढण्यासाठी उत्पन्नाचे स्रोत सुरगाणा नगरपंचायतीला निर्माण करावे लागणार आहेत. त्यात यश मिळाल्यास कर संकलन वाढून विकासकामांचा वेग वाढण्यास मदत होईल.---------------------स्वच्छतेवरील खर्च वाढलाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, आरटीआय, गल्ली बोळ आदी ठिकाणी सोडियम हायपोफ्लोराइड मारावे लागत आहे. कार्यालयीन कामकाज सोडून रिक्षाद्वारे स्पीकरवरु न नागरिकांना आवाहन करण्यात कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. विकास निधीवर परिणाम झाला आहे. तर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगर परिषदेचा स्वच्छतेवरील खर्च वाढला आहे.-----------------१नगरपंचायतीचे स्वमालकीचे गाळे असून काही गाळेधारकांकडून भाडे मिळाले आहे. तर काहींकडून अद्याप मिळालेले नाही. लॉकडाऊन काळात मंजूर करण्यात आलेली विकासकामे बंद होती, मात्र दुसºया-तिसºया टप्प्यात पूर्वीच्या विकासकामांना मंजुरी मिळाल्यानंतर शहर अंतर्गत भूमिगत गटार व कॉँक्रीट रस्त्याच्या कामांना सुरु वात करण्यात आली.२अद्याप नवीन विकासकामांना मंजुरी मिळालेली नाही. कोरोनामुळे कार्यालयीन कामकाज प्रभावित होऊन दररोज जमा होणारी विविध दाखला फी, हस्तांतर शुल्क, नक्कल फी, इमारत हस्तांतरण फी, इमारत बांधकाम फीच्या माध्यमातून मिळणाºया उत्पन्नात मोठी घट झाली आहे, परंतु कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाºयांना त्यांचे मासिक वेतन वेळेवर दिले जात आहे.३सुरगाणा कोरोनाबाधित रुग्णसंख्येत निरंक असला तरीदेखील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित कसे राखायचे यासाठी संपूर्ण नगर पंचायतीसह तालुका प्रशासनाकडून अहोरात्र मेहनत घेतली जात आहे, मात्र लॉकडाऊन संपल्याशिवाय विकासकामांना गती मिळणार नसून, शासनानेही निधी तत्काळ देण्याची मागणी नगर परिषदेच्या प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी केली आहे.
--------------------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे वसुली व विकासकामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे काहीसे नियोजन विस्कळीत झाले होते, मात्र आता लॉकडाऊन शिथिल होताच मंजूर असलेल्या आझादलेनमधील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर मेनरोड- वरील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
- सोनाली बागुल, नगराध्यक्ष, नगरपंचायतकोरोना संकटामुळे विकासकामे व कर वसुली बंद राहिल्याने आर्थिक नुकसानीची झळ बसली. असे असूनही नागरिकांच्या आरोग्यासाठी कुठलीही कमतरता ठेवण्यात आली नाही. तर पूर्वीची मंजूर असलेलीविकास कामे सुरू करण्यात आली आहेत. तीदेखील लवकरच पूर्ण केली जातील.- नागेश येवले, मुख्याधिकारी, नगरपंचायत