सिन्नर : खासदार हेमंत गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून सिन्नर तालुक्यातील देवपूर, निमगाव-देवपूर, शहा, भरतपूर, झापेवाडी, मिठसागरे व पांगरी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. लोकांच्या मागणीनुसार आपण विकासकामे राबवित असल्याचे खासदार गोडसे यावेळी म्हणाले. सिन्नर तालुक्याला सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी नदीजोड प्रकल्पातून देवनदी बारमाही प्रवाही करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करीत असल्याचे ते म्हणाले. खासदार गोडसे यांनी आपला सर्वाधिक निधी सिन्नर तालुक्याला दिला आहे, त्यांच्यात व आपल्यात चांगला समन्वय असल्याने सर्वसमावेशक विकासकामांसाठी आम्ही कटीबध्द असल्याचे आमदार वाजे यांनी सांगितले. विकासकामांमुळे जनतेचा शिवसेनेवरील विश्वास वृध्दींगत होत असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेना नेते उदय सांगळे, तालुकाध्यक्ष दीपक खुळे, गोविंद लोखंडे, बाजीराव बोडके, पिराजी पवार, सोमनाथ तुपे, गोकूळ नरोडे, दशरथ हांडोरे, प्रकाश पांगारकर, गणेश चव्हाणके, शाम कासार, रोशन गडाख, राजेश गडाख, मदन गोळेसर, धर्मा मुरडनर, भाऊसाहेब थोरात, नवनाथ वाक्चौरे, प्रशांत कुलकर्णी, साहेबराव जाधव, आर. आर. जाधव, अॅड. शरद चतुर आदि उपस्थित होते.(वार्ताहर)
खासदार निधीतील विकास कामांना वेग
By admin | Published: August 21, 2016 10:37 PM