मालेगाव : तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत भरली असून, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे महाविकास आघाडी पॅनलने आपले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. २०१०-२०१५ या वर्षात ग्रामपंचायतीचे सरपंच असताना, सरपंच संतोष शिवाजी निकम यांनी तत्कालीन आमदार पंकज भुजबळ व विद्यमान पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून गावात विविध विकास कामे केली. ही विकास कामे घेऊनच पॅनल मतदारांना सामोरे जात आहे. महाविकास आघाडी पॅनलतर्फे वॉर्ड क्र. १ मध्ये विकास मुरलीधर वाघ (सर्व साधारण गट), छाया संजय शेवाळे (सर्वसाधारण गट), वॉर्ड क्र. २ मध्ये संतोष शिवाजी निकम (नागरिकांचा मागास प्रवर्ग), रंगूबाई शांताराम साबळे (सर्वसाधारण गट), वॉर्ड क्र. ३ मध्ये अलका रामदास शेवाळे (बिनविरोध), वॉर्ड क्र. ४ मध्ये निंबा शामराव माळी (अनुसूचित जमाती), अशोक रामदास गांगुर्डे (अनुसूचित जाती), कविता रामदास माळी (अनुसूचित जमाती) तर वॉर्ड क्रमांक ५ मध्ये नीलेश जयवंत वाघ (सर्वसाधारण गट), नूतन भूषण दाते (सर्वसाधारण गट) आणि अर्चना समाधान अहिरराव (ओबीसी) हे उमेदवार आहेत. टाकळी ग्रामपंचायतीत ३ हजार ७४२ मतदार असून, त्यात १ हजार ७६७ महिला, तर १ हजार ९७५ पुरूष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच संतोष निकम करीत आहेत. सरपंच असताना निकम यांनी गावात सभा मंडप, ग्रामपंचायत कार्यालय, दलितवस्ती काँक्रिटीकरणाचे काम केले. आमदार पंकज भुजबळ यांच्या निधीतून गावात १० हातपंप बसवून रस्त्यांची दुरुस्ती केली. ठक्करबाप्पा योजनेतून सभा मंडप बनवून जुन्या धरणातील गाळ काढला.
------------------
टाकळी ग्रामपंचायतीतील महाविकास आघाडीचे पॅनल सत्तेवर आल्यास, भारत निर्माण योजनेची १० वर्षांपूर्वीच्या अपूर्ण कामांचा पाठपुरावा करून पूर्णत्वास नेण्यात येईल. गिरणा उजवा कालवा रुंदीकरण करून रोटेशनसंदर्भात पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यात येईल. गावातील रस्त्यांच्या कडेला वृक्षलागवड करून सुशोभीकरण करण्यात येईल. जोड रस्त्यावर फरशी पूल बांधणार असून, समाज मंदिराचे काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सर्वपक्षीय पदाधिकारी आपल्याबरोबर असल्याचा दावा पॅनल प्रमुख संतोष निकम यांनी केला आहे.
===Photopath===
080121\08nsk_1_08012021_13.jpg
===Caption===
पॅनल प्रमुख - संतोष निकम