नाशिकरोड : नाशिकरोडरेल्वेस्थानकाची मुंबई मध्य रेल्वेचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. आर. बद्रीनारायण यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. रेल्वेस्थानकावरील विकासकामे प्रगतिपथावर असून, त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील, असे बद्रीनारायण यांनी स्पष्ट केले. मध्य रेल्वेचे सहायक महाव्यवस्थापक डॉ. आर. बद्रीनारायण यांनी सोमवारी दुपारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील चारही प्लॅटफार्म, तिकीट व आरक्षण कार्यालय, सरकते जिने, रेल्वे सुरक्षा कार्यालय, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आदींची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी रेल्वेस्थानक स्वच्छतेबाबत पाहणी करताना कंत्राटी सफाई कामगारांना योग्य मोबदला मिळतो की नाही याबाबत विचारणा केली. यावेळी कंत्राटी कामगारांना कागदावर रेल दृष्टी या संकेतस्थळावर कंत्राटाची सर्व माहिती व नियम दिले आहेत, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. यावेळी भुसावळचे वरिष्ठ तिकीट अधिकारी अजयकुमार, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा, स्थानक प्रबंधक आर. के. कुठार, मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा आदी उपस्थित होते.ओला, उबेर टॅक्सीसाठी मुख्य प्रवेशद्वारासमोर जागा आरक्षित करण्यात आली असूनही अद्याप ही सेवा सुरू झाली नाही. त्यामुळे आवारातील वाहतुकीला अडथळा होत आहे. यावर डॉ. आर. बद्रीनारायण म्हणाले की, प्रवाशांच्या मागणीनुसारच ओला, उबेरची सेवा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
रेल्वेस्थानकातील विकासकामे प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:42 AM