देवगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो. आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात द्राक्षबागा सापडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे. द्राक्ष काढणीचा हंगाम संपताच शेतकऱ्यांनी एप्रिल छाटणीला सुरुवात केली. या छाटण्याही पूर्ण झाल्या; परंतु त्यानंतर बागा फुटण्याच्या प्रतीक्षेत असतानाच वाढत्या उन्हामुळे त्याचा परिणाम द्राक्षवेलींवर होत आहे. शिवाय या फुटीमागे पुढे होत असल्याने शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी वेगवेगळे उपाय करत आहेत. यामध्ये द्राक्षबागांत छाटणीनंतर टाकाऊ काड्या किंवा चिपाड, बारदानाचे आच्छादन तसेच मका कुट्टी, झाडांच्या बुडावर टाकून वाढत्या उन्हापासून संरक्षण केले जात आहे. तसेच ठिंबक सिंचनाद्वारे तसेच थंडावा मिळण्यासाठी संपूर्ण द्राक्षबागांना पाणी दिले जात आहे. सबकेन झालेल्या बागांना जो डोळा दिसत आहे तो कुठे एक डोळा, तर कुठे दोन डोळे अशी सध्या बागांची अवस्था झाली आहे. त्यामुळे येणाºया काळात घट होते की काय, असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून द्राक्षबागा धोक्यात येत असल्याने शेतकºयांना उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त करावा लागत आहे.याशिवाय वाढत्या उन्हामुळे शेतीची कामे मंदावली असल्याने मजुरांची टंचाई भासू लागली आहे. सध्या काड्यांची बांधणी, सबकेन, सेंद्रिय खते टाकणे ही कामे केली जात आहे. तसेच ही कामे सकाळी व सायंकाळी होत आहे. त्यामुळे मजूर मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे ही कामे शेतकºयांना घरीच करावी लागत आहे.
देवगाव : उत्पन्नात घट होण्याची भीती उन्हाच्या तडाख्याने द्राक्षबागा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:50 AM
देवगाव : द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यात दरवर्षी विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल होतो. आता वाढत्या उन्हाच्या तडाख्यात द्राक्षबागा सापडल्याने पुन्हा शेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाला आहे.
ठळक मुद्देशेतकरी अडचणीत सापडण्याच्या भीतीने चिंताग्रस्तवाढत्या उन्हापासून संरक्षण केले जात आहे