निफाड : तालुक्यातील देवगाव येथील पित्याने आपल्या दोन पुत्रांसह विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात पित्याचा मृत्यू झाला असून, दोन्ही मुले अत्यवस्थ आहेत. या मुलांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देवगाव येथील नारायणगीर यमगीर गोसावी (४०) यांनी स्वत: विषारी औषध सेवन करून तसेच आपल्या दोन मुलांनाही विषारी औषध देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारात नारायणगीर गोसावी यांचा मृत्यू झाला. त्यांच्या दोन्ही मुलांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २७ रोजी नारायणगीर यमगीर गोसावी (४०) व त्यांची मुले साई( ७) व रु द्र ( ५ ) या तिघांना नाशिक औरंगाबाद महामार्गावरील बोकडदरे गावाजवळील म्हसोबा माथा येथील म्हसोबा मंदिराच्या जवळ असलेल्या फॉरेस्टच्या वनात नागरिकांनी अत्यवस्थ स्थितीत पाहिले. नागरिकांनी तातडीने निफाड पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. तसेच या पितापुत्रांना तातडीने निफाड उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. तोपर्यंत नारायणगीर गोसावी हे मृत झालेले होते तर त्यांची दोन्ही मुले अत्यवस्थ होती. या मुलांना अधिक उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे गोसावी यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गोसावी यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. याबाबत अधिक तपास निफाडचे पोलिस उपनिरीक्षक कीर्ती जावरे करीत आहेत.
देवगावला पित्याची आत्महत्या; दोन मुले अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:14 AM