निकम दाम्पत्याचे एकापाठोपाठ निधन
एकलहरेः पती पाठोपाठ पत्नीचेही निधन झाल्याची ह्रदयद्रावक घटना नाशिकरोड येथे घडली. येथील गंगाधर सारजा निकम (७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पतीच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने पाठोपाठ चार दिवसांनी त्यांच्या पत्नी जयश्री गंगाधर निकम (६८) यांचेही निधन झाले. दोघेही जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. एकलहरे वीज केंद्रातील भांडार विभागातील उप कार्यकारी अभियंता सुषमा पगारे यांचे ते आई- वडील, तर कार्यकारी अभियंता मिलिंद पगारे व मुंबई येथे मंत्रालयात कार्यरत विनोद पगारे यांचे सासू-सासरे होत. (फोटो १४ गंगाधर, जयश्री)
--------------
आशाबाई चोपडा
नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोड येथील आशाबाई कांतीलाल चोपडा (रा. जैन भवन, ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जैन समाजाचे कार्यकर्ते रुपेश चोपडा त्यांच्या त्या आई होत. (फोटो १४ आशा)
-------
निवृती आहेर
आडगांव नाका : एचएएलचे सेवानिवृत कर्मचारी निवृती कुशाबा आहेर (७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगी, दोन मुले, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. (फोटो १४ आहेर)