नाशिक : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संस्थापक अध्यक्ष तथा नाशिक माहेश्वरी समाजाचे अध्वर्यू देवकिसन सारडा यांना महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या वतीने धुळ्यात होणाऱ्या सोहळ्यात महेशभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सारडा यांच्या माहेश्वरी समाजाप्रती योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय सेठ सीताराम बिहाणी (बांगडीवाला) यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाºया पुरस्कारार्थींच्या नावांचीही सभेतर्फे घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. रामप्रसाद लखोटीया (लातूर- शासकीय सेवा), शिवरतन मुंदडा (जालना- सार्वजनिक सेवा), कीर्ती बंग (अहमदनगर- शिक्षण), सुभाषचंद्र सारडा (बीड- शिक्षण क्षेत्रात विशेष कार्य), श्रद्धा लढ्ढा (जळगाव- क्रीडा), बरखा बाहेती (अहमदनगर- कला), भरत मंत्री (जालना- कृषी), रमेशचंद्र लाहोटी (जळगाव- साहित्य), श्रीकिसन भुतडा (इचलकरंजी- उद्योग), डॉ. नीलेश चांडक (जळगाव- विशेष सेवा) यांचा समावेश आहे. येत्या ७ आॅक्टोबर रोजी पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
देवकिसन सारडा यांना ‘महेशभूषण’ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:24 AM