खामखेडा : पावसाअभावी राज्यात सर्वत्र दुष्काळाची तीव्रता वाढू लागल्याने यंदा दिवाळीपूर्वीच मेंढपाळाचे वाडे दाखल झाल्याचे चित्र देवळा-सटाणा-कळवण परिसरात दिसून येत आहे.खामखेडा परिसरात बागायती शेती मोठया प्रमाणात असल्याने या भागामघ्ये खरिपातील बाजरी, मका, भुईमूग आदीसह उन्हाळी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या भागामघ्ये खरीपातील चारा व कांद्याच्या पाती चारण्यासाठी दिवाळी झाल्यानंतर बाहेर गावाहून मोठ्या प्रमाणात मेंढपाळाचे कळप येतात.हे मेंढपाळ पुन्हा पाऊस पडल्यावर आॅगस्ट महिन्यानंतर पुन्हा आपल्या गावाकडे परत जातात. मेंढपाळ दोन- तीन महिने आपल्या गावी राहून दिवाळी साजरी करून आठ दिवसांनी पुन्हा आपल्या मेंढ्या ,घोडे, बि-हाडासह भटकंतीला निघतात.दिवाळी नंतर खरिपाच्या पिकांची कापणी झालेली असते. तसेच लाल कांद्यासह रांगडा कांदा काढणीचा हंगामही सुरु असतो. त्यामुळे दिवाळी नंतर या भागात मेंढ्यांना मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध होतो. परंतु चालू वर्षी सुरवातीला बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यानंतर मेंढपाळ पाऊस पडल्यानंतर आपला गावाकडे परतले .परंतु नंतर पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे त्यांच्या भागात मेंढयांसाठी चारा झाला नसल्याने आपला कुटुंब कबिला घेऊन परिसरात भटकंती करावी लागत आहे. चालू वर्षी खामखेडा परिसरात अगदी अल्पसा पाऊस झाला आहे.त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात चारा उपलब्ध नाही. काही ठिकाणी लाल कांद्याची काढणी सुरु असल्याने या मेंढपाळांना पाहिजे त्या प्रमाणात चारा मिळत नाही. मका बाजरी, कापणी झालेल्या शेतात मेंढया चाराव्या लागत आहेत. पूर्वी या मेंढपाळाकडे आपली बिढारे वाहून नेण्यासाठी घोडे राहत असे. आता त्यांनी घोड्यांऐवजी बैलगाडीचा उपयोग सुरू केला आहे.
देवळा--कळवण परिसरात दिवाळीपूर्वीच मेंढपाळ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 4:40 PM
दुष्काळाची दाहकता : चारा-पाणीच्या शोधात भटकंती
ठळक मुद्देमेंढयांसाठी चारा झाला नसल्याने आपला कुटुंब कबिला घेऊन परिसरात भटकंती करावी लागत आहे