देवळा : देवळा ग्रामपालिकेचे नगरपंचायतीमध्ये रु पांतर होउन तीन वर्ष झाली, तरी अद्यापपर्यंत तत्कालीन ग्रामपालिका कर्मचाºयांपैकी बहुतांश कर्मचाºयांंचे समावेशन न केल्यामुळे या कर्मचाºयांमध्ये नाराजी आहे. यामुळे शासनाप्रती आपला निषेध व्यक्त करण्यासाठी गुरु वारी नगरपंचायत कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. नगरपंचायतीमधील तत्कालीन ग्रामपालिकेमध्ये कार्यरत सर्व कर्मचाºयांचे नगरपंचायतमध्ये समावेशन करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी नगरपालिका कर्मचारी समन्वय समिती सिटु संलग्न यांच्या वतीने जिल्हयातील सर्व नवनिर्मित कर्मचाºयांनी गुरु वारी निदर्शने केली. देवळा नगरपंचायत कर्मचार्यांनी आंदोलनाला पाठींबा देत नगरपंचायत कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता एक तास निदर्शने केली. यावेळी घोषणा देण्यात येउन शासनाचा निषेध करण्यात आला. देवळा नगरपंचायतीत वर्षभरापूर्वी दोन कर्मचार्यांचे समावेशन झाले असून उर्वरित कर्मचारी समावेशन होण्याची प्रतिक्षा करीत आहेत. आकृतिबंध २९ चा असतांना अवघे २० कर्मचारी नगरपंचायतीचे कामकाज पाहतात, शासकीय लेखापाल, विभागप्रमुख आदी संवर्ग पदे अद्यापही रिक्त असल्यामुळे हया कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा ताण पडतो. काम नगरपंचायतीचे परंतु वेतन मात्र ग्रामपंचायतीचे यामुळे दैनंदिन गरजा भागवतांना हया कर्मचाºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हया कर्मचाºयांना नगरपंचायत कामकाजाचा कोणताही अनुभव नसल्यामुळे कामकाजात अनेक अडचणी येतात. यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. हया कर्मचाºयांचे समावेशन शैक्षणिक-तांत्रिक अर्हता सर्व पात्रता धारण करणारे पद उपलब्ध नसल्याचे आदी विविध कारणास्तव हे कर्मचारी अपात्र ठरवण्यात आल्यामुळे हया कर्मचाºयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आंदोलनात देवळा नगरपंचायत कर्मचारी संघटनेने अध्यक्ष सुधाकर अहेर, दत्तात्रय बच्छाव, सुरेश अहेर, दिपक गोयल, सुनिल शिलावट, वसंत अहेर, शांताराम घुले, विकास अहेर, माणकि अहेर, राजेंद्र शिलावट, श्रीमती जागृती गोयल, सुशिला घोडेस्वार, धनुबाई गोयल, हौशाबाई साळुंके, विमल देवरे आदी देवळा देवळा नगरपंचायतीचे पुरु ष व महीला कर्मचारी सहभागी झाले होते.
प्रलंबित मागण्यांसाठी देवळा नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 1:23 PM