नाशिक : ब्रिटिश राजवटीत दुष्काळ ग्रस्त जनतेसाठी खजिना रिता करण्याचे धाडस देवमामलेदारांनी दाखवले म्हणून जनतेने देवत्व बहाल केले . आजच्या अधिकार्यांनी देखील आपल्या नोकरीशी प्रमाणिक राहून धाडस दाखविल्यास जनता डोक्यावर घेईल. आगामी काळात या तीर्थक्षेत्राचा चौफेर विकास करून देशासाठी हे स्मारक नक्कीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरात प्रत्यक्ष येऊन पाहणी केली होती. हेलिपॅड, चिनार विश्रामगृह, स्मारक स्थळ, दगाजी चित्रमंदिर यांसह सर्व आवश्यक ठिकाणी यंत्रणेचे विशेष पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येत होता. या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात नागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आला होता. दगाजी चित्रमंदिरात झालेल्या समारंभस्थळी राज्यपालासांठी खास ग्रीन रूम बनविण्यात आले होते. शासकीय विश्रामगृह चिनार हे कमी पडत असल्याने त्या ठिकाणी देखील तीन ग्रीन रूम बनविण्याण्यात आल्या. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती.
देवमामलेदार स्मारक देशासाठी प्रेरणादायी ठरेल : राज्यपाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 2:39 PM
या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी शहरातील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात नागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आला होता. दगाजी चित्रमंदिरात झालेल्या समारंभस्थळी राज्यपालासांठी खास ग्रीन रूम बनविण्यात आले होते.
ठळक मुद्देनागरिकांसाठी भव्य स्क्रीन उभारण्यात आला होता बांधकाम विभागातर्फे शहरातील रस्त्यांची डागडुजी