नाशिक : दिल्लीतील कथ्थक केंद्र, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, संगीत नाटक अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण देशभरातून केवळ ७५ कलावंतांच्या सादरीकरणात नाशिकच्या युवा नृत्यांगना भक्ती देशपांडे यांचेही सादरीकरण झाले.
पं. बिरजू महाराज, पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्या नृत्यश्री विद्या देशपांडे यांच्या कन्या आणि शिष्या असलेल्या भक्ती यांनी मंगळवारी सायंकाळी दिल्लीतील स्वामी विवेकानंद कलागृहात त्यांच्या नृत्याचे सादरीकरण केले. त्यांच्या नृत्याला मान्यवरांनीदेखील विशेष दाद दिली. संपूर्ण देशातून आलेल्या मान्यवर नृत्यांगनांना दररोज ५ याप्रमाणे सलग १५ दिवस हा सोहळा रंगणार आहे. भक्ती यांनी यापूर्वी अमेरिकेसह युरोपातील विविध देशांमध्ये सादरीकरण केले आहे. त्याशिवाय बाजीराव मस्तानी, डेढ इश्कीया, विश्वरुपम या चित्रपटांतील नृत्यातही कौशल्य दाखविले आहे. त्याशिवाय दिल्या घरी तू सुखी रहा मालिकेतही त्यांनी मुख्य भूमिकेत रंग भरले आहेत.
फोटो
येणार आहे.