मानोरी : मागील पंधरा दिवसांपासून येवला तालुक्यासह सर्वत्र उष्णतेचा पारा मोठ्या प्रमाणात जाणवायला सुरु वात झाली आहे. या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम सुरू झाले असून ताप, सर्दी, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे पेशंट वाढू लागले आहेत. लागण होण्यास सुरु वात झाली आहे.सकाळी १० वाजेपर्यंत गावातील गल्ल्यांमध्ये गर्दी असते. त्यांतर उन्हाच्या तीव्रतेमुळे संपूर्ण गावच ओस पडलेले असल्याचे बघायला मिळत आहे. तसेच रस्त्याने होणारी कायमची वाहनांची रहदारी सुद्धा उन्हाच्या तीव्रतेमुळे कमी झाल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढलेली असल्यामुळे थंडगार शीतपेयांची दुकानेसुद्धा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर मांडली जात आहे.दरम्यान, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वेळेत उन्हामुळे बदल करण्यात आला असून, सकाळी ७ वा. ५० मि. ते दुपारी १ वा. १५ मि. पर्यंत करण्यात आली आहे. सध्याचे वातावरण आणि उष्णता बघता सकाळी ११ वाजेनंतर प्रखर उष्णता पडण्यास सुरु वात होत असते.यात नवीन नियमानुसार दुपारी १ला शाळा सोडल्यास मोठ्याप्रमाणात उष्णतेच्या झळा बसत असतात. त्यात लहान मुलांना या उष्णतेचा त्रास झाल्यास मुले आजारी पडण्याचा धोका असल्याने शाळेच्या वेळेत केलेला बदल पुन्हा बदलावा अशी मागणी केली जात आहे.
उष्णतेच्या तीव्रतेने गाव पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:41 AM