सिडको : कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.मुख्य रास्ता बँड केल्याने याठिकाणी नागरिकांचा पोलीसांशीही वाद होत असल्याचे चित्र समोर दिसत आहे . परिसरातील मनपा प्रभाग क्र मांक २८ व २६ मध्ये येणारा डिजीपी नगर ते आयटीआय पुला दरम्यानचा मुख्य रस्ता कोरोनाच्या वाढत्या रु ग्णांची साखळी तोडण्यासाठी बंद करण्यात आल्याने सर्वांचेच कामे थांबली . तर कंपनीत जाणाऱ्यांसाठी पर्यायी रस्ता नसल्याने त्यांची ही कुचुंबणा होत आहे . तर जीवनावश्यक वस्तूंसाठी ही जाता येत नसल्याने संतप्त झालेल्या नागरीकांनी रस्त्यावर येत मार्ग मोकळा करण्याची मागणी केली .यावेळी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी तेथे जाऊन नागरीकांशी चर्चा करून , अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार चौधरी यांच्याशी बोलूनि केली. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता येथील काही भाग शिथिल करण्याचे आश्वासन पोलीस नि दिलयांव नागरीक शांत झाले . यावेळी सुधाकर जाधव, अशोक देवरे ,विलास खुटवड ,निलेश हाडंगे, निलेश पाटील, विधा खडसे, सुरज जाधव ,शरद खुटवड आदी उपस्थित होते.
डिजीपी नगर, आयटीआय रस्ता चौदा दिवसांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 6:09 PM
कोरोना बाधीतांची संख्या पाहता मनपा प्रशासन व नगरसेवकांनी डिजीपी नगर ते आयटीआय पुल दरम्यानचा मुख्य रस्ताच चौदा दिवसांसाठी बंद केला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून ये जा करतानाही अडचणी निर्माण झाल्याने याबाबत परिसरातील नागरिकांनामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देनागरिकांमध्ये तीव्र संताप वाहतुकीचा खोळंबा