शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

इगतपुरी तालुक्यातील ३० गावांत निवडणुकीचे धुमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 4:00 PM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ३० ग्रामपंचायतीच्या २४३ जागांसाठी येत्या मार्चमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजना, दुष्काळी अनुदान, मतदार याद्याची कामे आ िणनिवडणूक नियोजन करता करता तालुक्यातील यंत्रणेवर प्रचंड भार आला आहे. त्यातच तहसील कार्यालयातील रिक्त पदांमुळे निवडणूक यंत्रणेला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक कामासाठी यंदाही शिक्षकांना सहभागी करावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचेच्या परिक्षांवर परिणाम होणार आहे.

घोटी : इगतपुरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीने निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. ३० ग्रामपंचायतीच्या २४३ जागांसाठी येत्या मार्चमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजना, दुष्काळी अनुदान, मतदार याद्याची कामे आ िणनिवडणूक नियोजन करता करता तालुक्यातील यंत्रणेवर प्रचंड भार आला आहे. त्यातच तहसील कार्यालयातील रिक्त पदांमुळे निवडणूक यंत्रणेला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे. निवडणूक कामासाठी यंदाही शिक्षकांना सहभागी करावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचेच्या परिक्षांवर परिणाम होणार आहे. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी इच्छुकांनी जोरदार तयारीसुरू केल्याचे दिसते. लोकसभा विधानसभेची रंगीत तालीम निवडणुकीच्या निमित्तघेतली जाणार आहे.इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे, समनेरे, पाडळी देशमुख, नांदूरवैद्य, मालुंजे, मुरंबी, कावनई, कांचनगाव, पिंपळगाव मोर, अधरवड, पिंपळगाव भटाटा, मायदरा धानोशी, इंदोरे, धामणी, देवळे, उभाडे, सोनोशी, म्हसुर्ली, आहुर्ली, धार्नोली, कोरपगाव, रायांबे, शेवगेडांग, खैरगाव, खडकेद, बारशिंगवे, वाकी, बोरटेंभे, शेनवड बुद्रुक, मांजरगावया ३० गावांतील ग्रामपंचायत निवडणुकांनी निवडणुकीचा मोसम सुरू होत आहे. मुदत मागेपुढे संपत असली तरी निवडणुका एकाचवेळी होत आहेत. ३० गावांतील थेट सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या २४३जागांसाठी ही निवडणूक मार्चमध्ये होईल. यानंतर जूनमध्ये ६५ ग्रामपंचायतींच्या ६६० जागांसाठी निवडणूक होईल. ग्रामपंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढल्या जात नसल्या तरी गावात कोणत्या गटाची किंवा कोणत्या पक्षाच्या नेत्यांची सत्ता आहे हे सहजपणे ओळखता येते. यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे या पक्षांना उतरत्या क्र माने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही पक्षीय यश मिळाले आहे.