नाशिक : शहरातील जुगार अड्डा चालविणा-यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने दोन ठिकाणी छापे टाकत तीन जुगार अड्डा चालकांना बेड्या ठोकल्या .संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर आणि नाशिकरोडपोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत कबीरनगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी छापा टाकला. सोमनाथ देविदास बोहरा (रा.स्वारबाबानगर) आणि शशिकांत शंकर चारोस्कर हे दोघे स्व:ताच्या फायद्यासाठी टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळवितांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी मध्यवर्ती युनिटचे हवालदार भिमा कर्डीले यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिटको स्टॉप परिसरातील राजेंद्र कॉम्प्लेक्स समोर पत्र्याच्या शेडमध्ये चालणारा जुगार अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला. मंगळवारी सायंकाळी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला असता जुगार अड्डा मालक गुलाब सोमनाथ दिवे (रा.चाडेगाव) हा युवक स्व:ताच्या फायद्यासाठी पाच मिलन नाईट, मिलन कल्याण, ओपन कल्याण क्लोज, नावाचा मटका अंक आकड्यांवर खेळवितांना मिळून आला. लोकांकडून पैसे घेवून तो मटका जुगार खेळवित होता. त्याच्या ताब्यातून ५ हजार ३७६ रूपयांची रोकड आ हस्तगत करण्यात आले आहेत.
धाबे दणाणले : शहरातील जुगार अड्ड्याांवर पोलिसांचे छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:01 IST
नाशिक : शहरातील जुगार अड्डा चालविणा-यांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बुधवारी शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती युनिटने दोन ठिकाणी छापे टाकत तीन जुगार अड्डा चालकांना बेड्या ठोकल्या .संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी गंगापूर आणि नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत कबीरनगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये ...
धाबे दणाणले : शहरातील जुगार अड्ड्याांवर पोलिसांचे छापे
ठळक मुद्देकबीरनगर झोपडपट्टीत एका पत्र्याच्या शेडमध्ये जुगारपाच मिलन नाईट, मिलन कल्याण, ओपन कल्याण क्लोज, नावाचा मटका