इंदिरानगर : पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात दरवर्षीप्रमाणे यंदाही धमचक्र प्रर्वतन दिन व बुद्ध स्मारकाचा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसभर असलेल्या कार्यक्रमांमुळे या ठिकाणी जत्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते.विजयादशमीच्या दिवशी सर्वत्र धमचक्र प्रवर्तन दिवस साजरा करण्यात येत असतो. नाशिक महानगरपालिकेने पांडवलेण्याच्या पायथ्याशी उभारलेल्या बुद्ध स्मारकाचा वर्धापनदिन याचदिवशी साजरा करण्यात येतो. गुरुवारी सकाळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आलेले भन्ते व पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते धम्मध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन, वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भन्ते महास्तवीर, कोल्हापूरचे भन्ते संबोधी, भन्ते अनंत, कोपरगावचे भन्ते आनंद सुमनश्री यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. दिवसभर सुरू असलेल्या कार्यक्रमांना महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती हिमगोरी आडके, नगरसेवक भगवान दोंदे, राकेश दोंदे, दीक्षा लोंढे, कविता कर्डक, गौतम दोंदे, संजय नवले आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.नाशिकरोडला विविध कार्यक्रमदेवी चौक येथील बौद्ध विहारात धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व बुध्दवंदना म्हणून खिरदान करण्यात आले. धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त रिपाइंचे उपाध्यक्ष प्रियकीर्ती त्रिभुवन, उपनिबंधक शिवा पवार यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना म्हणून खीर दान करण्यात आले. यावेळी बुध्दविहार ट्रस्टचे अध्यक्ष भास्कर कटारे, पदमाकर भालेरावए संतोष जोपुळकर, दिनेश भालेराव, उल्हास पगारे उपस्थित होते.यात्रेचे स्वरूप प्राप्तबुद्ध स्मारक परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. नाशिक शहरातील विविध भागातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी केल्याने दिवसभर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सम्राट सोशल ग्रुप यांच्या वतीने एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धम्मचक्र प्रवर्तनदिनी बुद्ध स्मारक गजबजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:23 AM
पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेल्या बुद्ध स्मारकात दरवर्षीप्रमाणे यंदाही धमचक्र प्रर्वतन दिन व बुद्ध स्मारकाचा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसभर असलेल्या कार्यक्रमांमुळे या ठिकाणी जत्रेचे स्वरूपच प्राप्त झाले होते.
ठळक मुद्देबुद्ध वंदना : विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम