शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

कुपखेडा येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत डाळिंबबाग खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:27 AM

बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सटाणा : बागलाण तालुक्यात चौगावपाठोपाठ कुपखेडा येथेही शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे चार एकर डाळिंबबाग खाक झाली आहे. गुरुवारी (दि. १) दुपारी ३ वाजेच्या सुमारास वीज वाहिनीत शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून डाळिंब-बागेला आग लागली. यात दहा लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कुपखेडा येथील उषाबाई सखाराम जगताप यांच्या दोधेश्वर शिवारातील गट नंबर १२५/३ मध्ये चार एकर डाळिंबब आहे. यात पाच वर्षांपूर्वी १५२० डाळिंबरोपांची लागवड केली होती. त्यासाठी ठिबक सिंचन करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक शेतातून जाणाºया विद्युत वाहिनीजवळ शॉर्टसर्किटमुळे ठिणग्या पडून भीषण आग लागली. डाळिंबबागेत मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. आजूबाजूच्या शेतकºयांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र संपूर्ण बाग आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने उद्ध्वस्त झाली. या आगीत डाळिंबाची झाडे, ठिबक संच असे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी संतप्त असून, शेती व्यवसायावर गुजराण करणारे कुटुंब अशा घटनांमुळे उद्ध्वस्त झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून या कुटुंबाला उभे करण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महिला शेतकरी उषाबाई जगताप यांनी केली आहे.  तेल्यासारख्या महाभयंकर रोगाशी सामना करून शेतकरी डाळिंब पीक जतन करत आहेत. त्यात पाणीटंचाई आणि कवडी-मोल मिळणारा भाव यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्ज-बाजारी होत असताना वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे डाळिंबबागांना आग लागून शेतकºयांचे कुटुंबाचे कुटुंब देशोधडीला लागत आहेत.च्चौगाव व कुपखेडा येथे डाळिंबबागेला लागलेल्या आगीच्या घटना बागलाण-वासीयांसाठी नवीन नाही. यापूर्वी अनेक घटना घडल्या मात्र आजूनही अनेक पीडित शेतकºयांना भरपाई मिळाल्याचे उदाहरण नाही. शासनाने शेतकºयाला उभे करण्यासाठी तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून होत आहे.

टॅग्स :Fairजत्रा