सिन्नर: धनगर समाजाला एस. टी. दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करुन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.धनगड आणि धनगर हा एकच शब्द आहे असा अध्यादेश लवकरात लवकर काढावा व सर्व धनगर समाजाला एस. टी. चे दाखले द्यावेत, २०१९-२० या वर्षासाठी १ हजार कोटी व तिथून पुढे प्रत्येक वर्षी जे आदिवासींना ते धनगरांना हे ठरल्याप्रमाणे २०२०-२१ या वर्षात आदिवासींसाठी ८८५३ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तितकाच निधी २०२०-२१ साठी धनगर समाजाला द्यावा व उद्यापासून पुढील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.७ आॅगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार मागणील देवेंद्र फडणवीस सरकारने जे आदिवासींना तेच धनगर समाजाला या धर्तीवर एक हजार कोटीची तरतूद केली त्यानुसार दहा विविध योजना लागू केल्या होत्या. त्यासाठी २०१९-२० या वर्षासाठी ५०० कोटी जुलै मधील अथॅसंकल्पीय अधिवेशात मंजूर केले होते असे निवेदनात म्हटले आहे. मात्र आपले सरकार स्थापन होऊन खूप काळ लोटला आहे. त्यात अर्थसंकल्पीय व पावसाळी अधिवेशने झाली. मात्र एक पैसाही धनगर समाजाला दिला नाही. चालू असलेल्या सर्व योजना बंद केल्याचे निवेदनात म्हटले आहे.धनगर समाजाला एस. टी. चे आरक्षण लवकरात लवकर द्यावे व मागील सरकारने दिलेल्या सर्व योजना आदिवासींप्रमाण सुरु कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोार ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात लक्ष्मण बर्गे, दीपक सुडके, किरण कोथमिरे, प्रवणी शेळके, धर्मा मुरडनर, खठडेराव दैने यांच्यासह धनगर समा आरक्षण कृती समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.फोटो ओळी- सिन्नर येथे सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करुन विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
धनगर समाजाचे ढोल बजाव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 7:35 PM
सिन्नर: धनगर समाजाला एस. टी. दाखले देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी सिन्नर तालुका सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करुन तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
ठळक मुद्देसिन्नर: आरक्षणाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन