कळवण : दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदी आदिवासी नेते पोपटराव बहिरम, जनसंपर्क संचालकपदी योगेश मालपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.दि कळवण मर्चंट्स को-आॅप. बँकेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. निंबा कोठावदे, उपाध्यक्ष राजेंद्र अमृतकार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गायकवाड यांनी काम पाहिले. अध्यक्षपदाकरिता डॉ. धर्मराज मुर्तडक, तर उपाध्यक्षपदाकरिता आदिवासी नेते पोपटराव बहिरम यांनी नामांकन दाखल केले. कार्यकर्त्यांनी बँकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. निवडीप्रसंगी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे मावळते अध्यक्ष प्रा. निंबा कोठावदे, राजेंद्र अमृतकार, सुनील महाजन, प्रवीण संचेती, नितीन वालखडे, गजानन सोनजे, योगेश मालपुरे, प्रभाकर विसावे, भारती कोठावदे, शालिनी महाजन उपस्थित होते.
कमको बँकेच्या अध्यक्षपदी धर्मराज मुर्तडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 6:34 PM