अंदरसुल : येथील धर्मवीर संभाजी व्यायाम शाळेत राज्य शासनाच्या जिल्हा परिषद क्रि डा विभागामार्फत वेट लिफ्ट, रोलिंग पुली, डंबेल्स् आदी तेवीस प्रकारचे अद्यावत व्यायाम साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन दिप प्रज्वलन करण्यात आले ठाणे येथील माजी नगरसेवक मधुकर देशमुख यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्र माप्रसंगी अॅड. बाबासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले, मधुकर देशमुख, प्रकाश साबरे आदींनी युवकांना व्यायामाचे महत्व विषद केले यावेळी ग्रामीण भागातील मुली देखील क्र ीडा स्पर्धेतील सुवर्ण पदका पर्यंत पोहचल्याचे सांगत मुलींसाठीही क्र ीडा विभागाने आधुनिक व्यायाम शाळा उभारल्यास त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल असे प्रतिपादन सरपंच विनिता सोनवणे यांनी केले. दरम्यान ग्रामपंचायतच्या व युवकांच्या पाठपुराव्याने अत्याधुनिक व्यायाम उपकरणे मिळविणे जिल्हा क्रि डा अधिकारी रविंद्र नाईक, क्रि डा अधिकारी ईश्वर चौधरी तसेच सेवानिवृत्त क्रि डा अधीक्षक दिपक देशमुख यांचे सहकार्य मिळाल्याचे मान्यवरांनी मनोगतात बोलून दाखविले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राधाकिसन सोनवणे, पं. स. सभापती नम्रता जगताप, सदस्य प्रवीण गायकवाड, माजी सभापती किसनराव धनगे, हरिभाऊ जगताप, आप्पासाहेब देशमुख, भागीनाथ थोरात, मारु ती वाकचौरे, पंडित मेहकर, रंगनाथ वाकचौरे, मोहसीन इनामदार, सेवानिवृत्त क्र ीडा अधीक्षक दिपक देशमुख, अमोल सोनवणे, अभिजित देशमुख, महेश देशमुख, दिपक जगताप, सचिन बागुल, भाऊसाहेब बागुल, विश्वास देशमुख, उल्हास देशमुख, पृथ्वी देशमुख, प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन योगेश जहागीरदार यांनी तर आभार झुंजार देशमुख यांनी मानले.