नाशिक : राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, इगतपुरी येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करून ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़त्र्यंबकेश्वरला आंदोलनत्र्यंबकेश्वर : महाविकास आघाडी सरकारच्या विविध धोरणांच्या निषेधार्थ तसेच विविध मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर भाजपच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेवक त्रिवेणी तुंगार, भाजयुमोचे अध्यक्ष सुयोग वाडेकर, विजू पुराणिक, माजी तालुकाध्यक्ष कौशल्या लहारे अॅड. श्रीकांत गायधनी आदींसह शिक्षक आघाडीचे नेते सुनील बच्छाव, हर्षल भालेराव, दत्ता जोशी,नंदकुमार खैरनार, लता राऊत, देवका कुंभार आदी उपस्थित होते.सिन्नरला धरणेसिन्नर : येथील तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास प्रारंभ केला होता. तहसीलदार राहुल कोताडे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे यांच्यासह किशोर देशमुख, छबू कांगणे, सोनल लहामगे, दीपक श्रीमाळी, शुभम शिंदे, पद्माकर गुजराथी, राजेंद्र कपोते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.पेठ येथे निवेदनपेठ : शेतकºयांचा सातबारा सरसकट कोरा करावा, महिलांवरील अत्याचार थांबवावे, सरपंच निवड थेट जनतेतून करण्यात यावी यासह राज्य शासनाच्या विविध धोरणांना विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पेठ शाखेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. खासदार भारती पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष संजय वाघ, विजय देशमुख, रमेश गालट, त्र्यंबक कामडी, काशीनाथ भडांगे, छबीलदास चोरटे, छगन चारोस्कर, जीवन जाधव, प्रमोद शार्दुल, शांताराम शेवरे, रघुनाथ चौधरी यांच्यासह तालुक्यातील भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.निफाडला मोर्चानिफाड : भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाआघाडी सरकारविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. निफाड मार्केट यार्ड येथून मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी लासलगाव मार्केट कमिटीच्या सभापती सुवर्णा जगताप, प्रकाश दायमा, संजय गाजरे, सतीश मोरे, सारिका डेर्ले यांची भाषणे झाली. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात शेतरकºयांचा सातबारा कोरा करावा, सरपंच, नगराध्यक्षपद जनतेतून निवडण्यात यावे, महिलांवर अत्याचार करणाºया आरोपींना कठोर शासन व्हावे आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, भागवत बोरस्ते, तालुकाध्यक्ष संजय वाबळे, डी. के. जगताप, जिल्हा उपाध्यक्ष शंकर वाघ, बापू पाटील, तालुका विस्तारक संजय गाजरे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष मीना बिडगर, संजय शेवाळे सतीश मोरे आदींसह कार्यकर्ते, महिला व शेतकरी उपस्थित होते.येवल्यात भाजपची गटबाजी चव्हाट्यावरयेवला : राज्यात भाजपने शासनाविरोधात एल्गार पुकारला असताना येवल्यात भाजपची तहसील आवारात दोन आंदोलने झाली. त्यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा झाली. भाजपचा एल्गार आणि तालुका भाजपचा एल्गार वेगवेगळा पाहायला मिळाला. भाजप शहराध्यक्ष निवडणुकीवरून सुप्त स्वरूपात भाजपची शहरातील फळी नाराज असल्याची चर्चा होतीच, अशातच आंदोलनाच्या एल्गारमुळे दोन वेगवेगळी आंदोलने झाल्याने भाजप अंतर्गत गटबाजी निदर्शनास आली. शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रशासनास अशी दोन निवेदने देण्यात आली. आनंद शिंदे, नंदकिशोर शिंदे, दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखाली तहसील आवारात शासनाविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.येवला शहरात निषेधयेवला : महाविकास आघाडी सरकारच्या विविध धोरणांचा निषेध करीत, राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा भाग म्हणून येवल्यात भाजप कार्यकर्त्यांनी तहसील आवारात धरणे आंदोलन केले. तसेच तहसील प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते सुकृत पाटील, माजी अध्यक्ष मनोज दिवटे, युवा नेते बापू गाडेकर, शहराध्यक्ष तरंग गुजराथी, मनोज दिवटे, ज्येष्ठ नेते प्रमोद सस्कर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, पुरु षोत्तम रहाणे, नगरसेवक छाया क्षीरसागर, लीलावती पेटकर, राजू परदेशी, समीर समदडिया, राम बडोदे, राधेश्याम परदेशी, मदन जाजू, कुंदन हजारे, मुकेश चवळे आदींनी सरकारविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. नायब तहसीलदार राऊत यांना निवेदन देण्यात आले.दिंडोरीत निवेदनदिंडोरी : येथील तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील महाआघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. भारती पवार यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास पवार यांना देण्यात आले. यावेळी सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून परिसर दणाणून टाकला. ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, दिंडोरी शहराध्यक्ष श्याम मुरकुटे, विलास देशमुख, काका वडजे, रघुनाथ जाधव, फारु ख बाबा, नगरसेवक प्रमोद देशमुख, तुषार वाघमारे, योगेश बर्डे, संपत पिंगळ, मंगला शिंदे आदी उपस्थित होते.इगतपुरीत विविध मागण्यांसाठी साकडेइगतपुरी : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांसमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सत्तास्थापन केलेल्या शिवसेना सरकारने शेतकºयांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असताना शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. मात्र या आघाडी सरकारने शेतकºयांची फसवणूक केली असून, भाजप सरकारच्या काळात सुरू असलेले प्रकल्प व योजना बंद करून या सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब कडभाने यांनी केला. इगतपुरी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी कडभाने बोलत होते. याप्रसंगी विविध मागण्या व निषेधाचे निवेदन नायब तहसीलदार एम. एस. कारंडे यांना देण्यात आले. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, माजी तालुकाध्यक्ष आण्णासाहेब डोंगरे, ज्येष्ठ नेते पांडुरंग बºहे, संपतराव काळे, माजी शहराध्यक्ष मुन्ना पवार, पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली आडके आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:12 PM
राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, इगतपुरी येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करून ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़
ठळक मुद्देभाजप : येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, इगतपुरी येथे घोषणाबाजी; प्रशासनास निवेदन