शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

जिल्ह्यात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:44 PM

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचाराविरोधात कळवण, चांदवड, मनमाड, सटाणा, नांदगाव, देवळा येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करून ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़

ठळक मुद्देभाजप : कळवण, चांदवड, मनमाड, सटाणा, नांदगाव, देवळा येथे घोषणाबाजी

नाशिक : राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय केला आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचाराविरोधात कळवण, चांदवड, मनमाड, सटाणा, नांदगाव, देवळा येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करून ठिकठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़

चांदवडला धरणेचांदवड : येथे भारतीय जनता पार्टीचा धरणे आंदोलन आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले़ यावेळी नायब तहसीलादार के. पी. जंगम, एस. पी. भादेकर यांना निवेदन दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आत्माराम कुंभार्डे, उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, माजी सभापती नितीन गांगुर्डे, पंचायत समिती सभापती पुष्पा धाकराव, शहर अध्यक्ष प्रशांत ठाकरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शांताराम भवर, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, सरचिटणीस प्रभाकर ठाकरे, डॉ. राजेंद्र दवंडे, भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष डॉ. स्वाती देवरे, माजी तालुका अध्यक्ष सुनील शेलार, विलास ढोमसे, आदी उपस्थित होते.देवळ्यात निवेदनदेवळा: तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने नायब तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण, देवळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, ज्येष्ठ नेते अशोक आहेर, युवा नेते संभाजी आहेर, नानू आहेर, अनिल आहेर, बाळासाहेब आहेर, किशोर आहेर, बापू देवरे, प्रदीप आहेर, बाळासाहेब निकम, शंकर निकम, विजय आहेर, भाऊसाहेब आहेर, विजय सूर्यवंशी, दौलत थोरात, दीपक जाधव, मणेश ब्राह्मणकार, दिनेश देवरे, खुंटेवाडीचे उपसरपंच भाऊसाहेब पगार, नदीश थोरात, सुनील देवरे, नारायण रणधीर, दिनकर आहेर, भास्कर पवार,सोपान सोनवणे, किसन पवार, नीलेश पाटील, साहेबराव शिंदे, वैजनाथ देवरे, नितीन ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.सटाण्यात तहसीलवर धरणेसटाणा : येथे भाजपच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहराध्यक्ष राहुल सोनवणे, बिंदू शर्मा, सुरेश मोरे, कान्हू गायकवाड, नगरसेवक काका सोनवणे, दिनकर सोनवणे, शामकांत लोखंडे, नीलेश पाकळे, किरण नांद्रे, साखरचंद बच्छाव, संदीप पवार, रु पाली पंडित, पुष्पा सूर्यवंशी, नीता चव्हाण, सागर शिरोळे, प्रल्हाद अहिरे, शरद सूर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी, गणेश गायकवाड, मोठाभाऊ शेलार, राहुल जाधव, भाऊसाहेब सावकार, किरण गायकवाड, संजय गांगुर्डे, सोनाली ठाकरे, कल्पना पवार आदी उपस्थित होते.नांदगावला तहसीलदारांना निवेदननांदगाव: येथील जुन्या तहसील समोर भाजपने धरणे आंदोलन केले. भाजपा सरकारच्या कर्जमाफीचा लाभ सर्व प्रकारच्या शेतक ऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजपा सरकारच्या व्यापक कर्जमाफीमुळे ४३लाख खातेदारांना ११ हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचा निकष महाविकास आघाडी सरकारने बदलल्यामुळे शासकीय तूर खरेदीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. असे निवेदनात म्हटले आहे. भाजप प्रदेश सदस्य जयश्री दोंड, भावराव निकम, दत्तराज छाजेड, राहूल आहिरे, उमेश उगले, संजय सानप, विनोद आहिरे, राजीव धामणे, राजेंद्र आहेर, राहुल दरगुडे, कमलेश पेहरे, जितेंद्र चव्हाण, राजेंद्र कुंनगर, कृष्णा कदम. भरत पारख, विकास पगार आदींनी धरणे आंदोलणार भाग घेतला.मनमाडला मंडल कार्यालसमोर धरणेमनमाड : राज्य शासनाच्या कार्यपद्धतीविरोधात आवाज उठविण्यासाठी भाजप मनमाड शहर शाखेच्या वतीने मंडल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी, शेतकºयांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, महापोर्टल पुन्हा सुरू करण्यात यावे, थेट सरपंच निवड पुन्हा जनतेतून सुरू ठेवावी, नवीन रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे, खरीप पीकविम्याचे पैसे तत्काळ शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग करावे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना पुन्हा सुरू करण्यात यावी यासह अन्य मागण्या करीत भाजप कार्यकर्त्यांनी धरणे धरले. सध्याच्या महाआघाडीच्या राज्य सरकार- विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, जिल्हा चिटणीस नारायण पवार, ज्येष्ठ नेते उमाकांत राय, कांतिलाल लुणावत, शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, युवा मोर्चा उपाध्यक्ष सचिन दराडे, नितीन अहिरराव, नीलकंठ त्रिभुवन, सचिन लुणावत, महिला आघाडीच्या सोनी पवार, स्वाती मुळे, नितीन परदेशी, संदीप नरवडे, बुढनबाबा शेख, आनंद बोथरा, डॉ. सागर कोल्हे आदी उपस्थित होते.कळवणला सरकारच्या धोरणावर टीकास्रकळवण : तालुका भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा, महिला आघाडीसह विविध आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर जोरदार घोषणाबाजी, आंदोलन करून प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधून घेतले. भाजपचे कळवण तालुकाध्यक्ष दीपक खैरनार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, तालुकाध्यक्ष दीपक खैरनार, जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुप्ते यांना निवेदन देण्यात आले़ यावेळी दीपक खैरनार, सुधाकर पगार, निंबा पगार,सोनाली जाधव, संगीता आहेर, सुरेखा जगताप आदी उपस्थित होते़ शेतकºयांना सरसकट कर्जमाफी व्हावी, शेतकºयांसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, महापोर्टल पुन्हा सुरू करावे, थेट सरपंच निवडणूक घ्यावी, नवीन रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे, जलयुक्त शिवार योजना सुरू करावी आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :StrikeसंपBJPभाजपा