नाशिक : महाराष्ट्र बँकेने कर्मचाऱ्यांसमोबत केलेल्या कराराची जबाबदारी स्वीकारण्यास व्यवस्थापनाकडून टाळाटाळ होत असून महाराष्ट्र बॅँकेत सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना बढतीची संधी दिली असताना हंगामी सफाई कर्मचाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले. बॅँकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दोन वर्षांपुर्वी परीक्षा घेतली, मात्र पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून बँक व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी मागण्यासाठी एआयबीईएशी संलग्नीत ऑल इंडिया बॅँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बॅँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने शुक्रवारी शहरातील बँकेच्या मुख्य शाखसमोर धरणे आंदोलन केले . बॅँक ऑफ महाराषट्रच्या गडकरी चौक येथील विभागीय कार्यालयात शुक्रवारी (दि. २०) रोजी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले. नाशिकबरोबरच महाराष्ट्र बॅँकेच्या देशभरातील विभागीय कार्यालयांमध्ये आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास २ ऑक्टोबर रोजी पुणे येथील महात्मा गांधी पुतळ्यासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि ३ ऑक्टोबरला महाधरणे आंदोलन करण्याचा इशाराही बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी दिला आहे. व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष न देता उलटपक्षी त्यांना अपमानित करून नोकरीवरून काढण्याची भाषा केली जात आहे. महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या अनुषंगिक कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना येणाऱ्या अडचणींबाबत व्यवस्थापन बेजबाबदारपणे वागत आहे. अधिकाऱ्यांना दिलेल्या टर्मिनेशन नोटीसा परत घ्याव्यात. गैरसोयीच्या बदल्या तत्काळ रद्द कराव्यात. कामाचे नियमित तास असावे आणि सुटीच्या दिवशी कामावर बोलावू नये. हंगामी सफाई कर्मचाऱ्यांना कायम करून रिक्त जागा भराव्यात. आवश्यकतेनुसार क्लार्क भरती करावी. शाखा व एटीएम केंद्रात सिक्युरिटी गार्डची व्यवस्था करावी, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे. शिरीष धनक, किसन देशमुख, विनोद मोझे, आदित्य तुपे, मनोज जाधव यांच्यासह कर्मचारी आंदोलनात सहभागी होते.
महाराष्ट्र बँक कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 7:22 PM
महाराष्ट्र बँकेने कर्मचाऱ्यांसमोबत केलेल्या कराराची जबाबदारी स्वीकारण्यास व्यवस्थापनाकडून टाळाटाळ होत असून महाराष्ट्र बॅँकेत सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना बढतीची संधी दिली असताना हंगामी सफाई कर्मचाऱ्यांना त्यातून वगळण्यात आले. बॅँकेने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी दोन वर्षांपुर्वी परीक्षा घेतली, मात्र पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून बँक व्यवस्थापनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी मागण्यासाठी एआयबीईएशी संलग्नीत ऑल इंडिया बॅँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन आणि बॅँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनने शुक्रवारी शहरातील बँकेच्या मुख्य शाखसमोर धरणे आंदोलन केले .
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या गैरसोयीच्या बदल्या तत्काळ रद्द कराव्यातकामाचे नियमित तास असावे आणि सुटीच्या दिवशी कामावर बोलावू नये. प्रलंबित मागण्यांसाठी ऑल इंडिया बॅँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे धरणे आंदोलन बॅँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचाही आंदोलनात सहभाग