व्यवसायाला आलेली घरघर, डिझेलचे वाढलेले दर यांसह व्यवसायापुढील समस्यांवर चर्चा करण्यात आली. व्यावसायिकांनी एकत्रित येत जिल्हास्तरावर असोसिएशन स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अध्यक्ष व कार्याध्यक्षपदाची लगेचच निवड करण्यात आली.
कार्यकारिणीत जयंत धारणकर, सागर हासे, संतोष गायकवाड, बाळासाहेब मगर, राजेंद्र मांदळे, वसंत काकड, अर्जुन झाल्टे, कौशिक कदम, संजय चव्हाण, आदींचा समावेश आहे. बैठकीस भास्करराव धारणकर, राजेंद्र गायकवाड, इंद्रभान गायकवाड, संतोष गायकवाड, बाळासाहेब थोरात, प्रकाश कदम, कैलास गांजवे, अशोक कदम, मारुती दुर्गुडे, रमेश हासे, रावसाहेब गायकवाड, अन्सार शेख, नाना सूर्यवंशी, रवींद्र शिंदे, प्रभाकर धोंडगे, आदी उपस्थित होते.
इन्फो...
व्यावसायिकांनी दर वाढवले तरी शेतकरी जास्त दर देण्यास तयार होत नाहीत; त्यामुळे डिझेल दरवाढ मागे घेण्याची मागणी असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आली. सद्य:स्थितीत मजुरांना रोजगार देणेही परवडत नसल्याने व्यवसाय अडचणीत आला असून, समान दर निश्चिती वर भर देण्यात आला. असोसिएशनचे नियम काटेकोर पाळण्यात यावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
फोटो- १६ सिन्नर २
नैताळे येथे जिल्हा बोअरवेल असोसिएशनच्या बैठकीत उपस्थित व्यावसायिक.
===Photopath===
160321\16nsk_19_16032021_13.jpg
===Caption===
नैताळे येथे जिल्हा बोअरवेल असोसिएशनच्या बैठकीत उपस्थित व्यावसायिक.