आकाररणी सुरू केली असून मेनरोडवर बॅरिकेडस् टाकण्यात आलेले आहेत.
मात्र धुमाळ पॉइंट ते दहीपूल हा मार्ग खुला असल्याने या मार्गावरील गर्दी
वाढली आहे. दहीपूल हा देखील बाजारपेठेचा मोठा परिसर आहे. या
मार्गावरही शुल्क आकारण्याची गरज आहे.
ठक्कर बाजारातील गर्दी कायम
नाशिक: ठक्कर बाजार बसस्थानकातील व्यापारी संकुलात असलेल्या
दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत असून सुरक्षितता नियमांचे उल्लंघन हे
तांना दिसत आहे. प्रवाशांपेक्षा स्थानिक टवाळखोरांची येथील हॉटेल्सच्या
परिसरात गर्दी होत आहे. येथील गाळ्यांसमोर गाड्यांच्या देखील रांगा
लागलेल्या दिसतात.
जुने नाशिकमधील गर्दी कमी होईना
नाशिक: जुने नाशिक परिसरात असलेल्या बाजारपेठेत होणारी गर्दी कायम
असतांना त्याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष झल्याचे दिसते. स्थानिक नागरिक
पोलिसांच्या कारवाईला न जुमानता वेळेनंतरही दुकाने सुरूच ठेवत असल्याने
सायंकाळी सात वाजेनंतरही दुकानांमध्ये गर्दी दिसून येते. भद्रकाली परिसरात
होणाºया गर्दीवर नियंत्रण मिळविण्याची गरज आहे.
टाकळी मार्गावर दुभाजकाचे काम
नाशिक: टाकळी मार्गावरील दुभाजकांची उंची वाढविली जात असून त्यावर
लोखंडी दुभाजक लावण्याचे काम सुरू झाले आहे. येथील रस्त्याचे रुंदीकरण
झाल्यानंतर आता दुभाजकाचे काम हाती घेण्यात आले आहे. टाकळीचा मुख्य
रस्ता तसेच आयनॉक्सकडून येणाऱ्या मार्गावरील दुभाजकाचे सुशोभिकरण काम
वेगात सुरू आहे.
गोळे कॉलनतील मार्केटमध्येही गर्दी
नाशिक: शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोळे कॉलनीतदेखील
ग्राहाकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे मेनरोडप्रमाणे येथेदेखील सशुल्क प्रवेश
सुरू करण्याची गरज आहे. अरुंद रस्ते, वैद्यकीय दुकानांची गर्दी. अनेक
कार्यालये या ठिकाणी असल्याने ग्राहकांची सतत वर्दळ असते. येथील गर्दी
रोखण्यासाठीदेखील येथील मार्ग बंद करण्याची आवश्यकता आहे.