स्पर्धेचा विषय लोकमाता श्रीमती पुष्पाताई हिरे यांचे सामाजिक, शैक्षणिक कार्य असा होता. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. याप्रसंगी पुष्पाताई हिरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य अनिल पवार यांनी पुष्पाताईंचे अभीष्टचिंतन केले. हिरे कुटुंबाची गौरवशाली परंपरेचा आढावा घेत पुष्पाताई हिरे यांनी आरोग्यमंत्री असताना केलेले कार्य कौतुकास्पद होते असे सांगून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रांतील माहिती विशद केली. त्याचप्रमाणे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्थेच्या विकासातील योगदानाबद्दल माहिती दिली. राजेंद्र शेवाळे यांनी प्रास्ताविक केले, तर राजेश धनवट यांनी आभार मानले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर उपस्थित होते. कार्यक्रमास उपप्राचार्य सुनील बागुल, उपप्राचार्य रवींद्र शिरूडे, पर्यवेक्षक विलास पगार, संतोष सावंत, निवृत्ती निकम, जिभाऊ कन्नोर, संजय सूर्यवंशी, पांडुरंग शेलार, प्रमोद पिंपळसे व शिक्षक उपस्थित होते.
हिरे यांच्या जन्मदिनी हस्ताक्षर स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:13 AM