शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

६७ वर्षांनंतर हिरे कुटुंबीयांविना लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:19 AM

सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.

ठळक मुद्देसलग ४७ वर्षे मंत्रिपद घरात : मालेगाव बाह्यऐवजी यंदा मतदारसंघ बदलून उमेदवारी

नाशिक : सध्याच्या मालेगाव बाह्य व पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघाशी तब्बल ६७ वर्षे आपली नाळ कायम ठेवून सलग ४७ वर्षे मंत्रिपद भूषविणाऱ्या हिरे कुटुंबीयांनी यंदा या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी करणे टाळले; मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवून आपले अस्तित्व कायम ठेवले आहे.राजकारण व सत्ताकारणात मालेगाव तालुक्याची व पर्यायाने नाशिक जिल्ह्याची ओळख मुळातच कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यामुळे झाली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान व त्यानंतर झालेल्या निवडणुकांमध्ये भाऊसाहेबांनी कॉँग्रेस चळवळीत स्वत:ला झोकून दिले. १९५२ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊसाहेब पहिल्यांदा नांदगाव मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे गेले. त्यावेळी मालेगाव तालुक्यातील बहुतांशी गावांचा नांदगाव मतदारसंघात समावेश होता. मालेगाव व दाभाडी हे दोन्ही मतदारसंघ अस्तित्वात नव्हते. १९५२ मध्ये भाऊसाहेब निवडून आले. त्यानंतर १९५७ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणुकीत बाजी मारली. १९६२ मध्ये भाऊसाहेब यांचे पुत्र व्यंकटराव हिरे यांनी नांदगावमधून उमेदवारी केली. ते पहिल्या निवडणुकीत विजयी झाले.१९९९ मध्ये पुत्र प्रशांत हिरे हे एकदा येथून निवडून आले. २००४ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दादा भुसे यांची लढत प्रशांत हिरे यांच्याशी झाली. त्यावेळी भाजपकडून स्व. बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांना उमेदवारी दिली गेली; परंतु या निवडणुकीत दोन्ही हिरेंचा पराभव झाला व तेथून या मतदारसंघावरील हिरे कुटुंबीयांची पकड ढिली पडली. २००४ पासून ते २०१९ पर्यंत दादा भुसे यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला असला तरी, २००९ मध्ये पुन्हा प्रशांत हिरे यांनी उमेदवारी करून हिरे कुटुंबीयांवर विश्वास ठेवून असलेल्या मतदारांसमोर पर्याय उभा केला. त्यानंतर २०१४ मध्ये प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी स्व. भाऊसाहेब हिरे यांनी प्रतिनिधित्व केलेल्या नांदगाव मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी केली. त्यात त्यांचा पराभव झाला. यंदा मात्र २०१९ च्या निवडणुकीत म्हणजे तब्बल ६७ वर्षांनंतर मालेगाव बाह्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या दाभाडी मतदारसंघातून हिरे कुटुंबातील कुणीही उमेदवारी करीत नाही; परंतु ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात हिरे कुटुंबातील चौथी पिढी प्रचारात उतरलेली दिसत आहे, तर डॉ. अपूर्व हिरे राष्टÑवादीकडून नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी करीत आहेत.आणीबाणीनंतरच्या काळातही दाभाडीचा गड हिरेंकडेच११९६७ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यावर मालेगाव, नांदगाव तालुक्यातील काही गावे मिळून दाभाडी मतदारसंघाची निर्मिती झाली. १९६७ मध्ये व्यंकटराव हिरेंनी दाभाडीतून निवडणूक लढविली. त्यानंतर १९७२ मध्ये डॉ. बळीराम हिरे यांच्या रूपाने दुसºया पिढीकडे या मतदारसंघाची सूत्रे गेली. २स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जारी केलेल्या आणीबाणीनंतरच्या काळात १९७८ मध्ये देशात सर्वत्र कॉँग्रेसचा पराभव झालेला असताना दाभाडीचा गड डॉ. बळीराम हिरे यांनी कायम राखला. १९८० मध्ये पुन्हा निवडणुका झाल्यावर डॉ. हिरे निवडून आले.३ १९८५ मध्ये राज्यात पुलोदचा प्रयोग शरद पवार यांनी केला असता, दाभाडी मतदारसंघात स्व. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या स्नुषा पुष्पाताई व्यंकटराव हिरे यांनी भारतीय कॉँग्रेस (स) या पक्षाकडून उमेदवारी केली व त्यांनी त्यात डॉ. बळीराम हिरे यांचा पराभव केला. त्यानंतर सातत्याने १९९०, ९५ च्या निवडणुकीत पुष्पाताई हिरेंनी दाभाडीचा गड कायम राखला.हिरे कुटुंबीयांनी केले पक्षांतरसलग ४७ वर्षे मंत्रिपद ताब्यात ठेवणारे हिरे कुटुंबीय मूळचे कॉँग्रेसी विचारसरणीचे असले तरी, १९९९ मध्ये या कुटुंबाने पहिल्यांदा राजकीय घरोबा बदलला. प्रशांत हिरे यांनी सेनेत प्रवेश करून मंत्रिपदही मिळविले तर २००४ मध्ये प्रसाद हिरे यांनी भाजपची वाट धरली. त्यानंतर प्रशांत हिरे पुन्हा राष्टÑवादीत सामील झाले. २०१४ मध्ये प्रशांत हिरे यांच्या पुत्रांनी भाजपत प्रवेश केला. २०१८ मध्ये पुन्हा सर्व हिरे कुटुंबीय स्वगृही म्हणजे कॉँग्रेस विचारधारेकडे वळाले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019malegaon-outer-acमालेगाव बाह्य