येवला : येथील विधान परिषदेचे आमदार नरेंद्र दराडे यांचा खासगी लॅबचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल झालेल्या दराडे यांचा रुग्णालयाकडून झालेल्या चाचणीत अहवाल निगेटिव्ह आला.कोरोनामुक्त असणारे दराडे घरी परतले मात्र त्यांच्या कुटुंबीयातील नऊ सदस्यांचे नाशिकच्या शासकीय लॅबकडून कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले अन् कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब मुंबईस्थित खासगी लॅबकडून तपासल्यानंतर मात्र सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे कोरोना अहवाल आणि उपचाराचे सुरू असलेल्या बाजारी-करणाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या प्रकरणी तक्रार केली असून, नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, आरोग्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार नरेंद्र दराडे ग्रामपंचायत प्रशासक नियुक्तीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या तसेच नातेवाइकांच्या संपर्कात आल्याने त्यांनी लक्षणे नसतानाही पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक या खासगी लॅबकडून आपल्या स्वॅबची तपासणी करून घेतली असता, या लॅबकडून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ते तातडीने मुंबई येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले. तेथील डॉक्टरांनी त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेतला असता, दुसºयाच दिवशी अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे दराडे यांना रुग्णालयाने डिस्चार्जही दिला.-------------------शरद पवार यांच्यासह टोपे यांना निवेदन देणारकिशोर दराडे यांच्यासह २२ जणांचे स्वॅब आरोग्य विभागाने तपासणीसाठी घेतले. त्याचे अहवाल मंगळवारी, दुपारी आले. यात दराडे कुटुंबातील नऊ सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, कुटुंबातील एकाही सदस्याला लक्षण दिसत नसल्याने व नरेंद्र दराडे यांच्या अहवालातील गोंधळ पाहता मुंबईतील थॉयराकेअर या लॅबचे पथक येवल्यात बोलावून या नऊ सदस्यांचे स्वॅब पुन्हा तपासल्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. लॅबचा हा सावळागोंधळ कोठेतरी थांबावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्र ार केली असून, नाशिक येथे शरद पवार व आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांना निवेदन देणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.------------याप्रकरणी संबंधित लॅबची चौकशी करावी तसेच अनेक हॉस्पिटल बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून विमा पॉलिसी असलेल्यांना उपचारास दाखल करून घेण्यास नकार देत आहे. कॅश असेल तर बेड अशी स्थिती असल्याने त्यावरही नियंत्रण आणावे. - किशोर दराडे, आमदार, येवलालॅबच्या अहवालामुळे गोंधळ वाढून मनस्ताप झाला आहे. आता सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला असला तरी या संदर्भात मी स्वत: आरोग्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्र ार करणार आहे.- नरेंद्र दराडे, आमदार, येवला
दोन्ही लॅबच्या अहवालात भिन्नता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 9:58 PM